Home /News /money /

सोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम

सोनं पोहोचलं 46753 रुपयांवर, चांदीची चमकही कायम

जागतिक बाजारात (Global Market) सोनं (Gold) आणि चांदीचे (Silver) दर वाढण्याचा सिलसिला नव्या आठवड्यातही (New week) कायम असल्याचं दिसून आलं आहे.

    मुंबई, 26 जुलै: जागतिक बाजारात (Global Market) सोनं (Gold) आणि चांदीचे (Silver) दर वाढण्याचा सिलसिला नव्या आठवड्यातही (New week) कायम असल्याचं दिसून आलं आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशीच म्हणजे सोमवारी सोन्याची किंमत 46 हजार 753 रुपये प्रति तोळ्यावर बंद झाली. चांदीच्या किंमतीतही वाढ नोंदवली गेली. गेल्या आठवड्याच्या शेवटी सोन्याचा 10 ग्रॅमचा दर होता 46 हजार 584 रुपये. त्यात वाढ होऊन सोमवारी बाजार बंद होताना हा दर 46 हजार 753 वर पोहोचला. तर गेल्या आठवड्यात चांदीचा 65 हजार 684 रुपये हा दर सोमवारीदेखील चढाच राहिल्याचं दिसून आलं. गेल्या आठवड्यात चांदीच्या एका किलोचा दर होता 66 हजार 80 रुपये. सोमवारी या दरात 396 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. वाढीमागची कारणं अमेरिकेत आर्थिक गुंतवणुकीवर मिळणारा परतावा कमी झाल्यामुळे जगभरात सोनं आणि चांदीचे भाव वाढू लागल्याचं एचडीएफसी सिक्युरिटीजचे ज्येष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितलं आहे. आर्थिक गुंतवणुकीवरील परतावा कमी झाल्यामुळे गुंतवणूकदार तिथली गुंतवणूक काढून ती सोनं आणि चांदीमध्ये करत असल्याचं चित्र आहे. सोन्यातील गुंतवणूक वाढू लागल्यामुळे त्याची मागणी वाढत आहे आणि साहजिकच त्याचा परिणाम सोन्याच्या बाजारभावावर होत आहे. सोन्याच्या दरात वाढ होण्याचा हा सिलसिला पुढचे काही दिवस सुरू राहिल, असा अंदाज अर्थविश्वातून व्यक्त करण्यात येत आहे. हे वाचा -कोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान गुंतवणुकीची संधी सोन्यातील गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ असून अल्पावधीत सोन्यातील गुंतवणुकीतून चांगला नफा गुंतवणूकदार मिळवू शकतात, असा अंदाज या क्षेत्रातील विविध तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र कुठल्याही फसव्या सल्ल्याला किंवा अमिषाला बळी न पडता योग्य आर्थिक सल्ला घेऊनच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा, असंही सांगण्यात आलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today

    पुढील बातम्या