जाहिरात
मराठी बातम्या / मनी / HDFC च्या शेअर धारकांनो लक्ष द्या! या तारखेपासून बंद होईल ट्रेडिंग, पाहा शेअर होल्डरचं काय होणार

HDFC च्या शेअर धारकांनो लक्ष द्या! या तारखेपासून बंद होईल ट्रेडिंग, पाहा शेअर होल्डरचं काय होणार

एचडीएफसी बँक

एचडीएफसी बँक

HDFC Share News: 1 जुलैला मर्जरनंतर 13 जुलैला HDFC चे शेअर मार्केटमधून काढले जातील. HDFC ची अंतिम बोर्ड बैठक 30 जूनला होणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

HDFC Share News: एचडीएफसी बँकच्या विलीनीकरणानंतर 13 जुलैपासून एचडीएफसी लिमिटेडच्या शेअर्समधील ट्रेनिंग थांबतील. 13 ते 16 जुलै दरम्यान एचडीएफसी लिमिटेडच्या शेअर्समध्ये व्यवहार करता येणार नाहीत. यानंतर, 17 जुलैपासून स्टॉकमध्ये ट्रेडिंग सुरू होईल. CNBC Awaaz मध्ये तज्ञांनी सांगितले की, विलीनीकरणाच्या रेश्योमुळे, HDFC अल्पावधीत HDFC बँकेला मागे टाकू शकते. येत्या काही दिवसांत त्याला एचडीएफसी लाइफमध्येही आपला हिस्सा वाढवावा लागणार आहे. LTIMindtree संभाव्यतः HDFC Ltd च्या जागी निफ्टी 50 मध्ये सामील होऊ शकते. शेअर खरेदी करणाऱ्यांनी या गोष्टी अवश्य ठेवाव्यात लक्षात 1. एचडीएफसी लिमिटेडमध्ये विलीनीकरणानंतर, एचडीएफसी बँक जगातील 10 वी सर्वात मोठी बँक बनेल. एचडीएफसी बँकेला विलीनीकरणामुळे रिटेल कस्टमर एसेट पूलमध्ये प्रवेश मिळेल. विलीनीकरण प्रक्रियेअंतर्गत, जुलै 2023 मध्ये, HDFC लिमिटेडच्या शेअर धारकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक 25 शेअर्ससाठी HDFC बँकेचे 42 शेअर्स मिळतील. SBI WeCare: ज्येष्ठ नागरिकांसाठी गुडन्यूज! एसबीआयने वाढवली स्पेशल एफडी स्किमची डेडलाइन 2. व्हॅल्यूएशनविषयी बोलायचे झाल्यास, HDFC बँकेशी संबंधित व्यवसायांचे अंदाजे मूल्यांकन जसे की HDFC Life, HDB Financial आणि HDFC MMC रुपये 190 ते 220 प्रति शेअरच्या श्रेणीत आहे. दुसरीकडे, स्टँडअलोन व्यवसायाबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँकेचे प्राइज टू अर्निंग रेश्यो 13.5 मल्टीपलचा आहे. तर 5 वर्षांची सरासरी 20 मल्टीपलची आहे. तसेच, प्राइज टू बुक रेशो 2.2 मल्टीपलचा आहे. तर 5 वर्षांची सरासरी 3.5 मल्टीपल आहे. एचडीएफसी बँकेचा एसेट्स रिटर्न 1.9 ते 2.1 टक्के आणि इक्विटीवरील रिटर्न 15 ते 16 टक्क्यांच्या दरम्यान आहे. 3. बाजाराची सर्वात मोठी अपेक्षा आहे की विलीन झालेल्या घटकाचे वेटेज निफ्टी इंडेक्समध्ये वाढेल. त्यामुळे फ्लो देखील वाढेल आणि बँक चांगली कामगिरी करेल. दुसरीकडे, Goldman Sachs च्या मते, HDFC मध्ये विलीन झाल्यामुळे, बँकेला ग्राहकांच्या मोठ्या वर्गापर्यंत प्रवेश मिळेल. ज्याचा HDFC बँकेच्या किरकोळ व्यवसायाला फायदा होऊ शकतो. यासोबतच फंडामेटलच्या आधारावर, HDFC बँक चांगल्या स्थितीत आहे. Indian Brands: जगभरात प्रसिद्ध आहेत ‘हे’ भारतीय ब्रँड, विदेशातील लोकांनाही लावलंय वेड!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात