• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • बँकेचा हा मेसेज Ignore करू नका; नाहीतर बसेल 1 हजारचा फटका

बँकेचा हा मेसेज Ignore करू नका; नाहीतर बसेल 1 हजारचा फटका

जर तुम्ही 30 जून 2021 पर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही, तर तुम्हाला 1000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. अलिकडेच सरकारने वित्त विधेयकाद्वारे प्राप्तिकर अधिनियम 1961 मध्ये बदल करुन अशा प्रकारच्या दंडाची तरतूद केली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 12 मे : जर तुम्ही पॅन कार्ड (Pan Card) आधार कार्डाला (Aadhaar Card) लिंक केलं नसेल, तर तातडीनं ते करुन घ्या. कारण आता या कामासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी असून, कार्ड लिंक नसेल, तर मुदतीनंतर दंडही भरावा लागण्याची शक्यता आहे. आता बॅंका देखील पॅन कार्ड आधारला लिंक करण्याबाबत ई-मेल (Email) किंवा एसएमएस (SMS) ग्राहकांना पाठवत आहेत. त्यामुळे तुमच्या बॅंकेचा याविषयी मेल किंवा एसएमएस आला तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी मुदतवाढ देत 30 जून 2021 पर्यंत अवधी दिला आहे. कर विभागाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी ही अखेरची मुदत आहे. जे लोक पॅन आणि आधार कार्ड लिंक करणार नाही, त्यांच्याकडून मोठ्या रकमेचा दंड वसूल करण्याची तयारी सुरु केली आहे. करदात्यांना हे कार्ड लिंक करण्यासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु, असं असूनही अनेक करदाते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. 1000 रुपयांपर्यंत होऊ शकतो दंड - जर तुम्ही 30 जून 2021 पर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही, तर तुम्हाला 1000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. अलिकडेच सरकारने वित्त विधेयकाद्वारे प्राप्तिकर अधिनियम 1961 मध्ये बदल करुन अशा प्रकारच्या दंडाची तरतूद केली आहे. पॅन आणि आधार कार्ड लिंक न केल्यास दंड आकारणीसाठी सरकारने आयकर कायद्यात नवीन कलम 234H जोडला आहे.

(वाचा - YouTube वर छोटे व्हिडीओ बनवून करता येणार मोठी कमाई, कंपनीची घोषणा)

HDFC Bank पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची सोपी पध्दत - तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाईटवरुन पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं आहे की नाही याबाबत माहिती मिळवू शकता. यासाठी सर्वप्रथम आयकर विभागाच्या वेबसाईटवर जावा. आधार कार्डवरील नाव, पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक भरा. आधार कार्डवर केवळ जन्म दिनांक नमूद केली असेल, तर स्क्वेअरवर टिक करा. त्यानंतर कॅप्चा कोड टाईप करा. त्यानंतर Link Aadhaar या बटणावर क्लिक करा. तुमचं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक होईल.

(वाचा - सॉफ्टवेअर इंजिनियरने सुरू केला भाजी विकण्याचा व्यवसाय,आता होतोय 10 लाख टर्नओव्हर)

एसएमएसद्वारे (SMS) पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करण्याची पध्दत यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर UIDPAN त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि त्यानंतर 10 अंकी पॅन क्रमांक टाईप करावा लागेल. आणि हा मेसेज तुम्हाला 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवावा लागेल.
First published: