मराठी बातम्या /बातम्या /मनी /HDFC बँक देतंय Festive Treats! लोन आणि EMI सह मिळतील 10000 पेक्षा जास्त ऑफर

HDFC बँक देतंय Festive Treats! लोन आणि EMI सह मिळतील 10000 पेक्षा जास्त ऑफर

खासगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणारी एचडीएफसी बँक देखील ग्राहकांना या काळात खास 'ट्रीट्स' देणार आहे. बँकेने HDFC Bank Festive Treats 3.0 या योजनेची घोषणा केली आहे.

खासगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणारी एचडीएफसी बँक देखील ग्राहकांना या काळात खास 'ट्रीट्स' देणार आहे. बँकेने HDFC Bank Festive Treats 3.0 या योजनेची घोषणा केली आहे.

खासगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणारी एचडीएफसी बँक देखील ग्राहकांना या काळात खास 'ट्रीट्स' देणार आहे. बँकेने HDFC Bank Festive Treats 3.0 या योजनेची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर: सणासुदीच्या काळात विविध बँकांनी त्यांच्या ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणल्या आहेत. खासगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणारी एचडीएफसी बँक देखील ग्राहकांना या काळात खास 'ट्रीट्स' देणार आहे. बँकेने HDFC Bank Festive Treats 3.0 या योजनेची घोषणा केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बँक 10 पटींनी जास्त ऑफर्स यावेळी ऑफर करत आहे. यावर्षी तुम्हाला कार्ड, लोन आणि EMIवर 10000 पेक्षा जास्त ऑफर्स मिळतील. 'करो हर दिल रोशन' या थीमअंतर्गत या ऑफर्स दिल्या जात आहेत.

फेस्टिव्ह ट्रीटमध्ये ग्राहकांना मिळतील या ऑफर्स

>>प्रीमियम मोबाइल फोनवर कॅशबॅक आणि नो कॉस्ट ईएमआय.

>> iPhone वर 6,000 रुपयांचा कॅशबॅक

>> झिरो फोरक्लोजर शुल्कासह 7.50% पासून सुरू होणारे कार लोन

>> कमर्शिअल व्हेइकल लोन घेण्यावर प्रोसेसिंग फीमध्ये 50% सूट

>>  ट्रॅक्टर लोनवर झिरो प्रोसेसिंग फी आणि 90 टक्क्यापर्यंत फंडिंग

>> वॉशिंग मशीन आणि रेफ्रिजरेटर्स सारख्या इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्राहक उत्पादनांवर 22.5 टक्के पर्यंत कॅशबॅक आणि  नो कॉस्ट ईएमआय ऑफर

>> खात्यात त्वरित वितरणासह 10.25 टक्के सुरू होणारी वैयक्तिक कर्जे

वाचा-बँक एफडीपेक्षाही चांगला रिटर्न देईल पोस्ट ऑफिसची ही स्कीम, वाचा सविस्तर

10000 पेक्षा जास्त ऑफर्स

बँकेचे ग्रुप हेड (पेमेंट्स, कन्झ्युमर फायनान्स, डिजिटल बँकिंग आणि आयटी) पराग राव यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, 'सध्याचा फेस्टिव्ह सीझन अधिक आनंददायी बनवण्यासाठी आम्ही Festive Treat 3.0 सादर करत आहोत. यामध्ये आम्ही ऑनलाइन, ऑफलाइन आणि हायपरलोकल स्तरावर 10000 पेक्षा जास्त ऑफर्स देत आहोत.'

ग्राहकांच्या वैयक्तिक आणि व्यापारी गरजा पूर्ण करण्याचा मानस या स्कीमअंतर्गत बँकेकडून पूर्ण केला जाणार आहे. त्याकरता बँकेने अशा खास ऑफर्ससाठी 100 हून अधिक लोकेशन्सवर 10000 अधिक व्यापाऱ्यांशी पार्टनरशिप केली आहे.

वाचा-9 कोटी डॉलर्सची Cryptocurrency परत मागतोय CEO, एका बगमुळे मालामाल झाले युजर्स

शिवाय सध्या देशभरात टॉपवर असणाऱ्या महत्त्वाच्या ब्रँडसह देखील बँकेने पार्टनरशिप केली आहे. यामध्ये अॅपल, अॅमेझॉन, शॉपर्स स्टॉप, एलजी, सॅमसंग, सोनी, टायटन, सेंट्रल, अजिओ, रिलायन्स डिजिटल, रिलायन्स ट्रेंड्स, लाइफस्टाइल आणि अन्य ब्रँड्सचा समावेश आहे.

First published:
top videos

    Tags: Hdfc bank