मराठी बातम्या /बातम्या /मनी /9 कोटी डॉलर्सची Cryptocurrency परत मिळवण्यासाठी CEOची विनंती, एका बगमुळे मालामाल झाले युजर्स

9 कोटी डॉलर्सची Cryptocurrency परत मिळवण्यासाठी CEOची विनंती, एका बगमुळे मालामाल झाले युजर्स

क्रिप्टोकरन्सी फायनान्स प्लॅटफॉर्म असलेल्या कंपाउंडमध्ये काही अपडेट्स केले जात होते. त्या वेळी आलेल्या एका बगमुळे (bug) युजर्सकडे तब्बल 9 कोटी डॉलर्स मूल्याची क्रिप्टोकरन्सी ट्रान्सफर झाली.

क्रिप्टोकरन्सी फायनान्स प्लॅटफॉर्म असलेल्या कंपाउंडमध्ये काही अपडेट्स केले जात होते. त्या वेळी आलेल्या एका बगमुळे (bug) युजर्सकडे तब्बल 9 कोटी डॉलर्स मूल्याची क्रिप्टोकरन्सी ट्रान्सफर झाली.

क्रिप्टोकरन्सी फायनान्स प्लॅटफॉर्म असलेल्या कंपाउंडमध्ये काही अपडेट्स केले जात होते. त्या वेळी आलेल्या एका बगमुळे (bug) युजर्सकडे तब्बल 9 कोटी डॉलर्स मूल्याची क्रिप्टोकरन्सी ट्रान्सफर झाली.

    मुंबई, 05 ऑक्टोबर: जगभरातून क्रिप्टोकरन्सी (Investment in Cryptocurrency) अर्थात डिजिटल चलनाची मागणी वाढत आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. अनेक देशांमध्ये याला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. काही देशांनी मात्र क्रिप्टोकरन्सीवर बंदी घातली आहे. या आभासी चलनाचे व्यवहार कितपत सुरक्षित आहेत याबाबत खात्री नसल्याने अनेक देशांमध्ये क्रिप्टोकरन्सीला मान्यता नाही.

    दरम्यान, आता अशी एक घटना समोर आली आहे ज्यामुळे क्रिप्टोकरन्सीमधल्या व्यवहारांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. क्रिप्टोकरन्सी फायनान्स प्लॅटफॉर्म असलेल्या कंपाउंडमध्ये काही अपडेट्स केले जात होते. त्या वेळी आलेल्या एका बगमुळे (bug) युजर्सकडे तब्बल 9 कोटी डॉलर्स मूल्याची क्रिप्टोकरन्सी ट्रान्सफर झाली. प्रणालीमधल्या त्रुटीचा क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्मला (cryptocurrency platform) एवढा मोठा फटका बसला आहे. आता हे पैसे परत मिळवण्यासाठी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षरशः हात जोडून विनंती करत आहेत.

    हे वाचा-Bharati Airtel Rights Issue: भागधारकांना 535 रुपयांत मिळतील शेअर्स

    क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्मकडे पारंपरिक आर्थिक प्रणालीला पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. अशा परिस्थितीत एका बगमुळे झालेली ही एवढी मोठी चूक म्हणजे क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्मसाठी एक वाईट स्वप्नंच मानलं जात आहे. क्रिप्टोकरन्सीच्या या विकेंद्रीकृत प्लॅटफॉर्मवर बँका किंवा इतर मध्यस्थ नाहीत. ही प्रणाली संगणक कोडद्वारे युझर्सच्या निधीचं व्यवस्थापन करते. क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्ममध्ये 'कोड इज लॉ' हा मंत्र मानला जातो. कोडद्वारे संगणक कोड प्रणालीवर नियंत्रण ठेवलं जातं; मात्र जेव्हा कोडमध्ये त्रुटी असतात, तेव्हा ती युजर्ससाठी मोठी समस्या बनते, असं क्रिप्टोकरन्सीला विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे.

    अनेक क्रिप्टो प्रकल्पांवर टीका करणारे 'अमेरिकन फॉर फायनान्शिअल रिफॉर्म'चे वरिष्ठ धोरण विश्लेषक अँड्र्यू पार्क म्हणतात, की सध्याच्या बँकिंग प्रणालीवर टीका करण्याची अनेक कारणं आहेत. परंतु या प्रणालीत अशा गोष्टी घडू नयेत यासाठी अनेक सुरक्षा उपाय आहेत. माझे पैसे कंपाउंडमध्ये असतील, तर आता त्या प्रणालीवर माझा किती विश्वास असेल, असा सवालही त्यांनी केला आहे.

    हे वाचा-ऑक्टोबरमध्ये बंपर कमाईची संधी! Policy Baazar-Nykaa सह 12 कंपन्यांचे येणार IPO

    ही नुकतीच झालेली हाय-प्रोफाइल चूक आहे. एक क्रिप्टो प्रकल्प गेल्या महिन्यातही अनेक तास ब्लॅकआउट झाला होता. ऑगस्टमध्ये एका हॅकरने दुसऱ्या प्रकल्पातल्या त्रुटीचा फायदा घेऊन सुमारे 600 दशलक्ष डॉलर्सचं टोकन गोळा केलं; मात्र नंतर ते पैसे हॅकरने परत केले.

    युजर्सनी कंपाउंडच्या प्लॅटफॉर्मवर अपडेट करण्यास मान्यता दिल्यानंतर क्रिप्टोकरन्सी फायनान्स प्लॅटफॉर्म कंपाउंडमध्ये ही समस्या निर्माण झाली. यामध्ये एक बग होता. यामुळे युझर्सकडे 9 कोटी डॉलर्सची क्रिप्टोकरन्सी ट्रान्सफर झाली. कंपाउंड लॅब्स इंकचे सीईओ रॉबर्ट लेशनेर ट्विटरवर म्हणाले, की बगमुळे काही युजर्सची सीओएमपी ट्रान्सफर झाली. परंतु हा प्लॅटफॉर्म विकेंद्रीकृत असल्याने आणि प्रतीक्षा कालावधी आवश्यक असल्याने, त्यांच्या कंपनीला किंवा इतर कोणालाही टोकन वितरणासाठी प्रवेश नाही. सीओएमपी हे एक प्रकारचं टोकन आहे. याची किंमत शुक्रवारी (1 ऑक्टोबर) 319 डॉलर्स प्रति कॉइन एवढी होती.

    First published:
    top videos

      Tags: Money