मराठी बातम्या /बातम्या /मनी /

HDFC-HDFC Bank merger : HDFC खातेधारकांसाठी मोठी बातमी, बँकेच्या विलीनीकरणाचा होईल सर्वाधिक फायदा

HDFC-HDFC Bank merger : HDFC खातेधारकांसाठी मोठी बातमी, बँकेच्या विलीनीकरणाचा होईल सर्वाधिक फायदा

बँकेचे चेअरमन दीपक पारेख (Deepak Parekh) यांनी ही माहिती दिली. या विलीनीकरणामुळे बँकेला आपला हाउसिंग लोन पोर्टफोलिओ (Housing Loan Portfolio) वाढवायला मदत होणार असून, सध्याच्या ग्राहकांना अधिक सेवा देणं आणि ग्राहकसंख्या वाढवणंही शक्य होणार आहे.

बँकेचे चेअरमन दीपक पारेख (Deepak Parekh) यांनी ही माहिती दिली. या विलीनीकरणामुळे बँकेला आपला हाउसिंग लोन पोर्टफोलिओ (Housing Loan Portfolio) वाढवायला मदत होणार असून, सध्याच्या ग्राहकांना अधिक सेवा देणं आणि ग्राहकसंख्या वाढवणंही शक्य होणार आहे.

बँकेचे चेअरमन दीपक पारेख (Deepak Parekh) यांनी ही माहिती दिली. या विलीनीकरणामुळे बँकेला आपला हाउसिंग लोन पोर्टफोलिओ (Housing Loan Portfolio) वाढवायला मदत होणार असून, सध्याच्या ग्राहकांना अधिक सेवा देणं आणि ग्राहकसंख्या वाढवणंही शक्य होणार आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 4 एप्रिल : हाऊसिंग फायनान्स क्षेत्रातलं मोठं नाव असलेली हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (HDFC) आणि खासगी क्षेत्रातली मोठी बँक असलेली HDFC बँक यांचं विलीनीकरण होणार असल्याची घोषणा आज (4 एप्रिल) करण्यात आली. ही जुळी भावंडं एकमेकांमध्ये विलीन होण्याचा (The HDFC-HDFC Bank merger) सर्वाधिक फायदा HDFC बँकेच्या ग्राहकांना होणार आहे. बँकेचे चेअरमन दीपक पारेख (Deepak Parekh) यांनी ही माहिती दिली. या विलीनीकरणामुळे बँकेला आपला हाउसिंग लोन पोर्टफोलिओ (Housing Loan Portfolio) वाढवायला मदत होणार असून, सध्याच्या ग्राहकांना अधिक सेवा देणं आणि ग्राहकसंख्या वाढवणंही शक्य होणार आहे. HDFC आणि HDFC Bank विलीनीकरणामुळे सिंगल प्रॉडक्ट रिस्क कमी होणार आहे. तसंच, कम्बाइन्ड एंटिटीच्या असेट्सची विविधता वाढणार आहे. कम्बाइन्ड एंटिटी (Combined Entity) अर्थात या दोन्हींच्या विलीनीकरणातून उदयाला येणारी नवी कंपनी Mortgage Products सध्याच्या तुलनेत विनाअडथळा उपलब्ध करू शकेल, असं दीपक पारेख यांनी सांगितलं. दरमाह एक रुपया भरा आणि दोन लाखांचं विमा संरक्षण मिळवा, तुम्ही काढली का पॉलिसी? पारेख पुढेे म्हणाले की, रिअल इस्टेट कायद्यामुळे आगामी काळात गृहकर्ज व्यवसाय झपाट्याने वाढेल अशी आमची अपेक्षा आहे. गृहनिर्माण क्षेत्राला पायाभूत उद्योगाचा दर्जा मिळाल्याने आणि सर्वांसाठी घरे यांसारख्या सरकारच्या पावलांचाही या क्षेत्राला फायदा होईल. या विलीनीकरणामुळे एचडीएफसी बँकेला गृहकर्ज व्यवसाय वाढवण्यास मदत होईल, असा विश्वास एचडीएफसीला आहे. मनीमेकर्स इंडिया सिक्युरिटीजच्या IBBM कंपनीचे डायरेक्टर सुधांशू सिंग यांनी या विलीनीकरणाच्या अनुषंगाने काही माहिती दिली. 'हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या (HDFC) बोर्डाने सोमवारी (4 एप्रिल) अशी घोषणा केली, की HDFC लिमिटेड आणि HDFC बँक या दोन्हींचं एकमेकांमध्ये विलीनीकरण करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. कंपनी आणि शेअरहोल्डर्ससाठी हा निर्णय दीर्घ काळापासून प्रलंबित होता. कंपनीच्या शेअरहोल्डर्ससाठी या विलीनीकरणामुळे लाँग टर्म वेल्थची (Long Term Wealth Creation) निर्मिती होणार आहे. याचा Amalgamation Ratio 25/42 असा आहे. याचा अर्थ असा, की समजा एखाद्या व्यक्तीकडे दर्शनी मूल्य अर्थात Face Value 2 रुपये असलेले HDFC Ltd. चे 25 Fully Paid शेअर्स असतील, तर त्या व्यक्तीला दर्शनी मूल्य 1 रुपया असलेले HDFC Bank Ltd. चे 42 Fully Paid इक्विटी शेअर्स मिळतील,' असं त्यांनी सांगितलं. तुमच्या जवळपास स्वस्त पेट्रोल-डिझेल कसं शोधणार; 'या' अ‍ॅप्सद्वारे एका क्लिकवर कळेल 'स्कीम सुरू झाल्यानंतर एचडीएफसी बँकेकडून एचडीएफसी लिमिटेडच्या शेअरहोल्डर्सना इक्विटी शेअर्स रेकॉर्ड डेटनुसार दिले जातील. HDFC बँकेमध्ये HDFC लिमिटेडचे असलेले शेअर्स स्कीमनुसार Extinguish केले जातील. या दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणामुळे दोन्ही कंपन्यांचे ग्राहक, कर्मचारी आणि शेअरहोल्डर्स यांना दीर्घकालीन संपत्तीनिर्मितीद्वारे लाभ होईल, असं दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळांना वाटतं,' असंही त्यांनी स्पष्ट केलं. विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर, HDFC बँकेतील 100 टक्के हिस्सा सार्वजनिक भागधारकांकडे असेल. तसेच एचडीएफसी लिमिटेडचे ​​भागधारक एचडीएफसी बँकेत 41 टक्के हिस्सेदारी ठेवतील. विलीनीकरणात, HDFC च्या 25 शेअर्सऐवजी, HDFC बँकेचे 45 शेअर दिले जातील. या दोघांच्या विलीनीकरणानंतर जी बँक तयार होईल तिचे मार्केट कॅप 11 लाख कोटी रुपये असेल. या अर्थाने ही देशातील तिसरी सर्वात मोठी कंपनी बनेल.
First published:

Tags: Hdfc bank, Share market

पुढील बातम्या