मुंबई, 4 एप्रिल : विमा संरक्षण (Insurance Cover) किती गरजेचं आहे हे कोरोना काळात अनेकांना कळालं आहे. त्यामुळे विम्याबाबतचा लोकांना दृष्टीकोण हळूहळू बदल आहे. आपत्कालीन परिस्थितीत विमा हा सर्वात मोठा आधार ठरतो. संकटाच्या काळात आपण इतर गोष्टींच्या विचारात असताना विम्याच्या माध्यमातून आपल्याला कमी खर्चात मोठी आर्थिक मदत मिळू शकते. मात्र आता स्वस्त विमा कुठे मिळेल हा देखील प्रश्न आहे. याबद्दल माहिती घेऊयात. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PM Suraksha Bima Yojana-PMSBY) या विमा योजनेअंतर्गत, 2 लाख रुपयांचा अपघात विमा संरक्षण फक्त 12 रुपये खर्चून उपलब्ध आहे. म्हणजेच दर महिन्याला केवळ एक रुपयाचा खर्च करावा लागेल. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत (PMSBY) विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनीला 2 लाख रुपये मिळतात. अपघातात विमाधारकाचे दोन्ही डोळे पूर्णपणे निकामी झाले किंवा दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निरुपयोगी झाले किंवा एका डोळ्याची दृष्टी गेली किंवा एक हात किंवा पाय काम करत नसेल तर विमाधारकास दोन लाख रुपये मिळतील. व्यक्ती अंशतः अपंग असल्यास 1 लाखांपर्यंतचे कव्हरेज उपलब्ध आहे. तुमच्या जवळपास स्वस्त पेट्रोल-डिझेल कसं शोधणार; ‘या’ अॅप्सद्वारे एका क्लिकवर कळेल विमा संरक्षण कसे मिळवायचे? 2015 मध्ये पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू करण्यात आली. 18 ते 70 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक मुदत योजना आहे आणि ती एक वर्षासाठी वैध आहे. त्यानंतर दरवर्षी त्याचे नूतनीकरण करावे लागते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज बँक खात्याद्वारे करता येतो. विमा घेणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे. तुमचे खाते असलेल्या बँकेत तुम्हाला PMSBY चा फॉर्म भरावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर तुमच्या बँक खात्यातून दरवर्षी 12 रुपये कापले जातात. या योजनेत 1 जून ते 31 मे या कालावधीत एक वर्षाचे विमा संरक्षण दिले जाते. पॉलिसीधारकाच्या बँक खात्यात 31 मे पर्यंत पुरेशी रक्कम असणे आवश्यक आहे जेणेकरून 12 रुपयांचा प्रीमियम बँक खात्यातून कापला जाईल. अपघात झाल्यास क्लेम 30 दिवसांच्या आत करावा लागतो आणि क्लेम 60 दिवसांच्या आत निकाली काढला जातो. Multibagger Stock: गुंतवणूकदार 6 महिन्यात करोडपती! 2,46,257 टक्क्यांहून अधिक परतावा देणारा ‘हा’ शेअर कोणता? कोट्यवधी लोक घेतायेत फायदा देशातील कोट्यवधी लोक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांची संख्याही 27.26 कोटींच्या पुढे गेली आहे. आर्थिक सेवा विभाग (DFS) ने म्हटले आहे की ही अशी एक सामाजिक सुरक्षा योजना आहे ज्यामध्ये पॉलिसीधारकाला 12 रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागतो आणि त्या बदल्यात त्यांना 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.