मराठी बातम्या /बातम्या /मनी /तुमच्या जवळपास स्वस्त पेट्रोल-डिझेल कसं शोधणार; 'या' अ‍ॅप्सद्वारे एका क्लिकवर कळेल

तुमच्या जवळपास स्वस्त पेट्रोल-डिझेल कसं शोधणार; 'या' अ‍ॅप्सद्वारे एका क्लिकवर कळेल

Petrol-Diesel Price: अनेक अॅप्स आहेत जी तुम्हाला इंधनाशी संबंधित माहिती सहजपणे देतील, ज्यामुळे तुम्हाला स्वस्त इंधन कसे आणि कुठे मिळेल हे जाणून घेणे सोपे होईल.

Petrol-Diesel Price: अनेक अॅप्स आहेत जी तुम्हाला इंधनाशी संबंधित माहिती सहजपणे देतील, ज्यामुळे तुम्हाला स्वस्त इंधन कसे आणि कुठे मिळेल हे जाणून घेणे सोपे होईल.

Petrol-Diesel Price: अनेक अॅप्स आहेत जी तुम्हाला इंधनाशी संबंधित माहिती सहजपणे देतील, ज्यामुळे तुम्हाला स्वस्त इंधन कसे आणि कुठे मिळेल हे जाणून घेणे सोपे होईल.

मुंबई, 4 एप्रिल : देशभरात वेगाने वाढणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किमतींनी (Petrol-Diesel Price Hike) नागरिकांची चिंता वाढवली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने इतर वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे महागाईची (Inflation) चौफेर झळ नागरिकांना बसत आहे. मात्र या महागाईच्या काळाच काही प्रमाणात स्वस्त इंधन उपलब्ध झालं तर किती बरं वाटेल. आता पेट्रोल किंवा डिझेलची किंमत जाणून घेणे फार मोठे काम नाही. अनेक अॅप्स उपलब्ध आहेत जे तुम्हाला मदत करतील. आज आम्‍ही तुम्‍हाला अशा अ‍ॅप्सबद्दल सांगणार आहोत, ज्याच्‍या मदतीने तुम्‍हाला तुमचे इंधन स्वस्त दरात कोठे मिळेल हे जाणून घेता येईल.

SmartDrive

BPCL चे हे अॅप आहे जे तुम्हाला दररोजच्या इंधनाच्या किमतींची माहिती देईल. तुमच्या स्थानिक इंधन स्टेशनचे लोकेशन आणि किमती देखील दाखवते. या अॅपद्वारे तुम्ही तुमच्या जवळ स्वस्त दरात इंधन कुठे मिळेल याची माहिती घेऊ शकता.

MapMyFuel

हे क्राउडसोर्स केलेले अॅप आहे. या अॅपवर युजर्स एकमेकांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती देतात. याशिवाय सीएनजीशी संबंधित माहितीही या अॅपवर उपलब्ध आहे. या अॅपमध्ये तुम्हाला IOCL, HPCL, BPCL, रिलायन्स पेट्रोलियम, एस्सार पेट्रोलियम आणि शेल इंडिया अंतर्गत स्टेशनची माहिती मिळेल.

Petrol Diesel Prices Hike : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलचा भडका, आज पुन्हा दरवाढ

Fuel@IOC

इंडियन ऑइल कंपनीचं हे अॅप आहे जे तुम्हाला तुमच्या शहरातील थेट पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तपासण्यात मदत करते. मात्र हे अॅप केवळ ऍपल आणि अँड्रॉइड डिव्हाइस वापरणाऱ्या यूजर्ससाठी उपलब्ध आहे. या अॅपमधील 'Locate Us' टॅबवर क्लिक करून यूजर्स जवळपास उपलब्ध असलेल्या सर्व पेट्रोल पंपांची माहिती सहज मिळवू शकतात.

IOCL, BPCL आणि HP वेबसाइट

सर्व प्रमुख ऑइल कॉर्पोरेशनकडे वेबसाइट्स आहेत ज्यांच्या मेन पेजवर पर्याय आहेत जे तुम्हाला शहरानुसार इंधन दर आणि तुलना करण्यासाठी मागील दर दाखवतात.

Petrol Diesel Price: देशात सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात विकलं जातंय; काय आहे दर?

RSP डीलर कोड 92249-922949

सर्व पेट्रोल पंप डीलर्सनी त्यांच्या यूजर्सच्या सोयीसाठी त्यांचा डीलर कोड प्रदर्शित करावा. 92249-92249 वर 'RSP DEALER CODE' एसएमएस पाठवून यूजर्स त्यांच्या शहरातील इंधनाच्या किमती तपासू शकतात. भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमसाठी ही सेवा उपलब्ध आहेत.

इतरही अनेक अॅप्स आहेत जी तुम्हाला इंधनाशी संबंधित माहिती सहजपणे देतील, ज्यामुळे तुम्हाला स्वस्त इंधन कसे आणि कुठे मिळेल हे जाणून घेणे सोपे होईल. याशिवाय अनेक क्रेडिट कार्ड आणि पेमेंट्स अॅप वर इंधन घरेदीवर डिस्काऊंट मिळते.

First published:

Tags: Money, Petrol and diesel price, Petrol Diesel hike