जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Aadhaar Card हरवलं आहे? जाणून घ्या नवीन कार्ड मिळवण्यासाठी सोपी पद्धत

Aadhaar Card हरवलं आहे? जाणून घ्या नवीन कार्ड मिळवण्यासाठी सोपी पद्धत

Aadhaar Card हरवलं आहे? जाणून घ्या नवीन कार्ड मिळवण्यासाठी सोपी पद्धत

UIDAI ने आधार कार्ड होल्डर्ससाठी (Aadhaar Card Holders) एक तरतूद जारी केली आहे. यामुळे हरवलेल्या आधार कार्डची एक कॉपी मिळणास मदत होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : आधार कार्ड (Aadhaar Card)हरवलं असेल, कुठे सापडत नसेल, तर काळजी करण्याचं कारण नाही. UIDAI ने आधार कार्ड होल्डर्ससाठी (Aadhaar Card Holders) एक तरतूद जारी केली आहे. यामुळे हरवलेल्या आधार कार्डची एक कॉपी मिळणास मदत होणार आहे. आधार कार्ड हरवल्यास तर एक डुप्लिकेट आधार कार्ड (Duplicate Aadhaar Card) बनवता येणार आहे. नवीन आधार कार्ड (New Aadhaar Card) बनवण्यासाठी युजर्सला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. नवीन आधार कार्डसाठी UIDAI च्या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर वेबसाईटवरील ‘My Aadhaar’ ऑप्शनवर टॅप करावं लागेल. त्यानंतर ‘Retrieve lost or forgotten EID/UID ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. एक नवं पेज ओपन होईल, तेथे काही डिटेल्स भरावे लागतील. डिटेल्समध्ये आधार कार्ड नंबर, एनरोलमेंट नंबर जो Enrollment करताना Allot केला असेल, मोबाईल नंबर, संपूर्ण नाव टाकावं लागेल. जर हरवलेलं आधार कार्ड विना मोबाईल नंबर मिळवायचं असेल, तर ईमेल आयडीही देता येऊ शकतो.

(वाचा -  नाव आणि जन्मतारीख जुळत नसेल तर ‘या’ पद्धतीनं Aadhar Card आणि PAN करा लिंक )

त्यानंतर डिटेल्स सेक्शनमध्ये खाली देण्यात आलेला कॅप्चा कोड भरावा लागेल. त्यानंतर ‘Send OTP’ ऑप्शन निवडा. त्यानंतर वन टाईम पासवर्ड मिळवण्यासाठी mAadhaar अ‍ॅपचा वापर करावा लागेल. त्यानंतर पेमेंट गेटवेकडे निर्देशित केलं जाईल. तिथे पेमेंट डिटेल्समध्ये 50 रुपये पेमेंट करावं लागेल. पेमेंट झाल्यानंतर, आधार कार्डच्या हार्ड कॉपीसाठी Applicable होता येईल. त्यानंतर 15 दिवसांच्या आत स्पीड पोस्टद्वारे आधार कार्ड रिसिव्ह होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात