Home /News /money /

बापरे! गुटखा बनवणाऱ्याने थकवला तब्बल 831 कोटींचा GST, अधिकारीही हैराण

बापरे! गुटखा बनवणाऱ्याने थकवला तब्बल 831 कोटींचा GST, अधिकारीही हैराण

संबंधित गुटखा उत्पादकाला तपास यंत्रणेने अटक केली असून 4.14 कोटी रुपयांचा गुटख्याचा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 05 जानेवारी:  पश्चिम दिल्ली भागात एका गुटखा उत्पादकाने कोट्यवधींचा जीएसटी (GST) चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित गुटखा उत्पादकाला तपास यंत्रणेने अटक केली असून  4.14 कोटी रुपयांचा गुटख्याचा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे. या उत्पादकाने एवढ्या मोठ्या प्रमाणात जीएसटी चोरी कशी केली, असा प्रश्न तपास अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. जीएसटी किंवा कर चोरीची मोठी घटना दिल्लीमध्ये (Delhi) घडली आहे. एका गुटखा उत्पादकाने हा गुन्हा केला आहे. या घटनेने तपास यंत्रणा देखील चक्रावून गेली असून, या उत्पादकाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर जीएसटी चोरी कशी केली याचा आता तपास यंत्रणा शोध घेत आहेत. जीएसटी चोरी म्हणजे व्यवसायातील जीएसटी कर न भरणे. या आरोपीस अटक करुन त्याची रवानगी तुरुंगात (Jail) करण्यात आली आहे. आरोपी हा गुटखा उत्पादित करुन देशभर त्याची विक्री करत होता. या उत्पादकाने कोणत्याही प्रकारची नोंदणी केलेली नव्हती. (हे वाचा-IND vs AUS: न्यूझीलंडच्या फॅननं स्टीव्ह स्मिथला केलं ट्रोल, झळकवला हा बोर्ड) पश्चिम दिल्लीतील सीजीएसटी कार्यालयाने (CGST Office) दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एक आरोपी गुटखा उत्पादन करुन त्याची देशभरात विक्री करीत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. या आरोपीने आपल्या उत्पादक कंपनीसंदर्भात कोणतीही नोंदणी केलेली नाही. या माहितीच्या आधारे सीजीएसटी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीच्या परिसरात छापे टाकले. या छाप्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा, चुना, कात तसेच तंबाखूची पाने आदी कच्चा माल आढळून आला. या कच्च्या मालाची अंदाजे किंमत 4.14 कोटी रुपये आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला साठा आणि रेकॉर्ड पाहता तसेच संबंधितांच्या जबाबानुसार 831.72 कोटींचा जीएसटी थकवल्याचा झाल्याचा अंदाज आहे. याबाबत पुढील तपास सुरु असून, या प्रकाराच्या मुळाशी जाण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्नशील आहेत. दोन शिफ्टमध्ये 130 पेक्षा अधिक कर्मचारी करीत होते गुटखा उत्पादन सीजीएसटी अधिकाऱ्यांना या तपासादरम्यान गुटखा निर्मिती करणारी मशीन्स घटनास्थळी आढळून आली आहेत. घटनास्थळी छापा टाकण्यात आला त्यावेळी 65 कर्मचारी कार्यरत होते. याठिकाणी दोन शिफ्टमध्ये काम होत असल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित लोकांनी यावेळी दिली. (हे वाचा-मुलींच्या शिक्षणासाठी 'या' राज्य सरकारचा अनोखा उपक्रम, दररोज मिळणार 100 रुपये) कर चुकवण्याच्या उद्देशाने मालाचे उत्पादन आणि पुरवठा कोणत्याही चलनाशिवाय करणे, तसेच याच पध्दतीने वस्तुंची वाहतूक करणे, वस्तु जमा करणे, पुरवठा आणि खरेदी करणे या कामांमध्ये सहभागावरुन सदर व्यक्तीला अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या आरोपीला 2 जानेवारीला पाटियाला हाऊस न्यायालयाच्या मेट्रोपोलिटीन मॅजिस्ट्रेट समोर हजर करण्यात आले होते. यावेळी या आरोपीस न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठेवण्याची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील प्रमुख आरोपीची ओळख आणि कर थकबाकी वसूल करण्यासाठी पुढील तपास सुरु आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: GST, Money

    पुढील बातम्या