Home /News /money /

GST Slab: महागाईचा बोजा आणखी वाढणार;143 वस्तूंच्या किमती वाढवण्याची शक्यता, GST काऊन्सिलची शिफारस

GST Slab: महागाईचा बोजा आणखी वाढणार;143 वस्तूंच्या किमती वाढवण्याची शक्यता, GST काऊन्सिलची शिफारस

राज्यांच्या संमतीनंतर अनेक गोष्टी Exempt List मधून बाहेर होतील त्यात गूळ आणि पापड अशा वस्तूंचा समावेश आहे. अशा परिस्थितीत त्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

    मुंबई, 24 एप्रिल : महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्यांना अधिक त्रास होऊ शकतो. जीएसटीचे नियमन करणाऱ्या जीएसटी कौन्सिलने (GST Council) 143 वस्तूंवरील कर जीएसटी स्लॅब (GST Slab) वाढवण्यासाठी राज्यांकडून सूचना मागवल्या आहेत. या सूचनांवर राज्यांकडूनही करार झाला, तर महागाईने सर्वसामान्यांना आणखी त्रास होणार आहे. GST परिषदेने एकूण 143 वस्तूंचा GST स्लॅब वाढवण्याची सूचना केली आहे. 'एबीपी न्यूज'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. 'या' वस्तूंच्या किमती वाढवण्याची शिफारस इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या 143 वस्तूंमध्ये पापड, गूळ, पॉवर बँक, घड्याळ, सुटकेस, परफ्यूम, टीव्ही (32 इंचापर्यंत), चॉकलेट, कपडे, गॉगल, फ्रेम, वॉशबेसिन, अक्रोड, कस्टर्ड पावडर, हाताच्या पिशव्या, च्युइंगम, नॉन-अल्कोहोलिक ड्रिंक्स, ग्लासेस आणि चामड्याच्या वस्तूंच्या किमती वाढू शकतात. यापैकी जवळपास 92 टक्के वस्तूंच्या किमती 18 टक्के जीएसटी कर स्लॅबवरून 28 टक्के कर स्लॅबमध्ये हलवाव्यात, असे जीएसटी परिषदेने सुचवले आहे. यासोबतच अनेक गोष्टींना सूट यादीतून काढून त्यांना कराच्या कक्षेत आणण्याचाही विचार सुरू आहे. जीएसटी परिषद नोव्हेंबर 2017 आणि 2018 मध्ये ज्या गोष्टींसाठी जीएसटी दर कमी करण्यात आले होते ते देखील परत घेऊ शकतात. New IPO: गुंतवणूकदारांनो तयार राहा; पुढील आठवड्यात 14 हजारांच्या गुंतवणुकीवर मिळू शकतो मोठा नफा 2017 मध्ये गुवाहाटी येथे झालेल्या GST कौन्सिलच्या बैठकीत परफ्यूम, चामड्याच्या वस्तू, कपडे, कॉस्मेटिक उत्पादने, फटाके, प्लास्टिक, लॅप्स, साउंड रेकॉर्डर इत्यादी वस्तूंवर GST कापण्यात आला होता. जीएसटी कौन्सिलच्या सध्याच्या शिफारशी मान्य केल्या तर आता या सर्व गोष्टींवर जास्त पैसे मोजावे लागतील. यासह, तुम्हाला टीव्ही सेट (32 इंच), डिजिटल आणि व्हिडिओ कॅमेरे, पॉवर बँक इत्यादींच्या किमतींमध्येही वाढ होऊ शकते. 2018 च्या GST बैठकीत या सर्व वस्तूंच्या किमतीत कपात करण्यात आली होती. LIC IPO बाबत मोठी अपडेट, आयपीओ कधी लॉन्च होऊ शकतो? किती शेअर्स विक्रीला असणार? या गोष्टी Exempt List मधून बाहेर असतील राज्यांच्या संमतीनंतर अनेक गोष्टी Exempt List मधून बाहेर होतील. त्यात गूळ आणि पापड आहे. अशा परिस्थितीत त्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्याच वेळी हँडबॅग, वॉशबेसिन, रेझर, चॉकलेट, कोको पावडर, मनगटी घड्याळे, कॉफी, नॉन-अल्कोहोलिक पेये, डेंटल फ्लॉस, परफ्यूम, घरगुती वस्तू, दरवाजे, इलेक्ट्रिकल वस्तू इत्यादी 18 टक्के जीएसटीमधून काढून 28 टक्क्यांच्या GST स्लॅबमध्ये ठेवले जाईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: GST, Money, Tax

    पुढील बातम्या