जाहिरात
मराठी बातम्या / मनी / New IPO: गुंतवणूकदारांनो तयार राहा;14 हजारांच्या गुंतवणुकीवर मिळू शकतो मोठा नफा

New IPO: गुंतवणूकदारांनो तयार राहा;14 हजारांच्या गुंतवणुकीवर मिळू शकतो मोठा नफा

New IPO: गुंतवणूकदारांनो तयार राहा;14 हजारांच्या गुंतवणुकीवर मिळू शकतो मोठा नफा

2020 पासून अनेक मोठ्या कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. पुढील आठवड्यात कोणत्या दोन कंपन्या त्यांचा IPO घेऊन बाजारात येत आहेत याबद्दल माहिती घेऊ.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 एप्रिल : शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market Investors) करणारे कमी वेळेत चांगला परतावा मिळावा यासाठी IPO मध्ये गुंतवणूक करतात. अशा गुंतवणूकदारांना पुढील आठवड्यात कमाईची चांगली संधी आहे. पुढील आठवड्यात दोन मोठ्या कंपन्या त्यांचे IPO येणार आहेत. तुमचीही आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याची (Investment) योजना असेल, तर ही तुमच्यासाठी चांगली संधी असू शकते. 2020 पासून, बाजारात भरपूर IPO आले आहेत. अनेक मोठ्या कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. पुढील आठवड्यात कोणत्या दोन कंपन्या त्यांचा IPO घेऊन बाजारात येत आहेत याबद्दल माहिती घेऊ. कॅम्पस अॅक्टिव्हवेअर (Campus Activewear) आणि रेनबो चिल्ड्रन्स मेडिकेअरचा IPO (Rainbow Children’s Medicare IPO) पुढील आठवड्यात सबस्क्रिप्शनसाठी उघडत आहे. या IPO मध्ये तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल सविस्तर पाहूयात. कॅम्पस ऍक्टिव्हवेअर IPO 26 एप्रिल 2022 उघडेल आणि 28 एप्रिल 2022 रोजी बंद होईल. या आयपीओचा प्राइस बँड 278-292 रुपयांदरम्यान असेल. आयपीओमध्ये एका लॉटसाठी किमान गुंतवणूक 14178 रुपये असेल, ज्यामध्ये 51 शेअर्स असतील. आयपीओचा इश्यू साइज 1400 कोटी रुपयांचा आहे. कर्ज घेणे चांगलंही आणि वाईटही; तज्ज्ञांचं मत वाचा, कर्जबाजारी होण्यापासून नक्की वाचाल OFS किती असेल? कॅम्पस IPO अंतर्गत 5.1 कोटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) आणेल. त्याचे विद्यमान प्रमोटर हरिकृष्ण अग्रवाल आणि निखिल अग्रवाल यांच्या व्यतिरिक्त, TPG ग्रोथ-3 SF प्रायव्हेट लिमिटेड आणि QRG Enterprises सारखे गुंतवणूकदार देखील त्यांचे शेअर्स विकतील. रेनबो चिल्ड्रन मेडिकेयर आयपीओ 27 एप्रिल 2022 रोजी उघडेल तर 29 एप्रिल 2022 बंद होईल. आयपीओचा प्राइस बँड 516-542 रुपये असेल. यामध्ये किमान गुंतवणूक 13932 रुपयांची असेल. यासाठी लॉट साइज 27 शेअर्सची असेल. आयपीओची एकून साईज 1581 कोटी असेल. तुम्ही जास्तीत जास्त 13 लॉट खरेदी करू शकता. LIC IPO बाबत मोठी अपडेट, आयपीओ कधी लॉन्च होऊ शकतो? किती शेअर्स विक्रीला असणार? कंपनीचा व्यवसाय काय आहे? कंपनीच्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर, 1999 मध्ये, पहिल्यांदा हैदराबादमध्ये 50 खाटांचे हॉस्पिटल बांधले गेले. मुलांशी संबंधित सुविधा देणारी कंपनी म्हणून ही कंपनी बाजारात सक्रिय आहे. सध्या, कंपनीची 14 रुग्णालये आहेत आणि 6 शहरांमध्ये दवाखाने कार्यरत आहेत, ज्यांची क्षमता सुमारे 1500 खाटांची आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात