जाहिरात
मराठी बातम्या / मनी / LIC IPO बाबत मोठी अपडेट, आयपीओ कधी लॉन्च होऊ शकतो? किती शेअर्स विक्रीला असणार?

LIC IPO बाबत मोठी अपडेट, आयपीओ कधी लॉन्च होऊ शकतो? किती शेअर्स विक्रीला असणार?

LIC IPO बाबत मोठी अपडेट, आयपीओ कधी लॉन्च होऊ शकतो? किती शेअर्स विक्रीला असणार?

रशिया-युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे एलआयसीचा आयपीओ काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला. बदललेली परिस्थिती पाहता सरकारला इश्यूचा आकार 3.5 टक्क्यांपर्यंत खाली आणणे भाग पडले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 एप्रिल : LIC च्या मेगा IPO ची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, LIC च्या IPO बद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय आयुर्विमा महामंडळाने म्हणजेच LIC त्यांचा IPO आकार पूर्वीच्या 5 टक्क्यांवरून 3.5 टक्क्यांवर आणला आहे. IPO मधून 21 हजार कोटी रुपयांची उभारणी अपेक्षित आता सरकार LIC मधील 3.5 टक्के शेअर्स 21,000 कोटी रुपयांना विकणार आहे, हे नियामक मान्यतेच्या अधीन असेल. एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उघडणाऱ्या IPO दरम्यान सरकारी हिस्सेदारी विक्रीतून सुमारे 21,000 कोटी रुपये उभारण्याची अपेक्षा आहे. त्याच्या इश्यूसाठी, LIC बुधवारपर्यंत बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे अंतिम मंजुरी अर्ज दाखल करू शकते. कर्ज घेणे चांगलंही आणि वाईटही; तज्ज्ञांचं मत वाचा, कर्जबाजारी होण्यापासून नक्की वाचाल LIC IPO मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो एलआयसीच्या आयपीओच्या संदर्भात, या अधिकाऱ्याने सांगितले की, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एलआयसीचा आयपीओ बाजारात येण्याची शक्यता आहे. एलआयसीने गेल्या फेब्रुवारीमध्ये सेबीकडे ड्राफ्ट इश्यू डॉक्युमेंट दाखल केले होते. त्यावेळी एलआयसीने सांगितले होते की, सरकार या विमा कंपनीतील 5 टक्के स्टेक म्हणजेच 316 कोटी शेअर्स विकणार आहे. खाद्य तेलामुळे घराचं बजेड बिघडणार? तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता; काय आहेत कारणे रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे एलआयसीचा आयपीओ काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला. बदललेली परिस्थिती पाहता सरकारला इश्यूचा आकार 3.5 टक्क्यांपर्यंत खाली आणणे भाग पडले आहे. सवलत, किंमत, तारीख इत्यादींबाबत निर्णय २७ एप्रिलपर्यंत शक्य अधिकाऱ्याने सांगितले की, LIC पॉलिसीधारक आणि कर्मचार्‍यांसाठी आरक्षण, सवलत, जारी करण्याची तारीख आणि इश्यूची किंमत बुधवारपर्यंत कळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात