जाहिरात
मराठी बातम्या / मनी / GST काउन्सिलच्या बैठकीत रोजच्या जीवनातल्या 'या' गोष्टी होणार स्वस्त

GST काउन्सिलच्या बैठकीत रोजच्या जीवनातल्या 'या' गोष्टी होणार स्वस्त

GST काउन्सिलच्या बैठकीत रोजच्या जीवनातल्या 'या' गोष्टी होणार स्वस्त

GST, Modi Government - जीएसटी मीटिंगमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी स्वस्त होणार आहेत

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 सप्टेंबर : जीएसटी काउन्सिलची 37वी बैठक येत्या 20 सप्टेंबरला आहे. या बैठकीत मोठमोठे निर्णय होऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार कार-बाइक, बिस्किट्स या गोष्टींवरचा कर कमी होण्याची आशा आहे. असं झालं तर अनेक गोष्टींची किंमत कमी होईल. 20 सप्टेंबरला होणाऱ्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत यावेळी 5 टक्क्यांऐवजी 8 टक्क्यांच्या दराला टॅक्सचा सर्वात खालचा स्लॅब बनवला जाईल. GST काउन्सिलची बैठक - मिंटमध्ये आलेल्या बातमीनुसार मोदी सरकार देशाची आर्थिक वाढ पुन्हा एकदा रुळावर आणायची आहे. त्यासाठी सरकार अनेक गोष्टींवरचा GST कमी करायचं पाहतेय. तुमच्या क्रेडिट कार्डावर मिळणाऱ्या ‘या’ 5 सुविधा तुम्हाला माहीत आहेत का? यातल्याच एका अधिकाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत या प्रस्तावांवर चर्चा होऊ शकते. गेल्या आठवड्यात राज्य आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची फिटमेंट कमेटी बैठक झाली होती. यात कारवरचा जीएसटी हटवला तर सरकारच्या मिळकतीवर किती परिणाम होईल यावर चर्चा झाली होती. सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या, पेट्रोल-डिझेल झालं ‘इतकं’ महाग सूत्रांच्या माहितीनुसार 20 सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीत जीएसटीच्या दरांना घेऊन मोठा निर्णय होणार आहे. ऑटो सेक्टरचे GST दर कमी करण्याची मागणी - 20 सप्टेंबरला गोव्यात जीएसटी काउन्सिलची बैठक होणार आहे. आता वाहनांवर जीएसटीचा दर 28 टक्के आहे. ऑटो कंपनींनी तो 18 टक्के करावा अशी मागणी केलीय. दिवाळीच्या आधी सुरू होतेय अमेझाॅनची ‘फेस्टिव यात्रा’, ग्राहकांसाठी ‘या’ ऑफर्स कार तयार करणाऱ्यांचं म्हणणं आहे की, यामुळे कार्सची विक्री वाढेल. ऑटो सेक्टरमध्ये चांगले दिवस येतील. ऑटो कंपन्यांना जीएसटीशिवाय 1 ते 22 टक्के काम्पनसेशन सेसही द्यावा लागतो. रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरींनी हायब्रिडसहित दुसऱ्या वाहनांवर जीएसटी कमी करण्याचं अपिल केलंय. VIDEO: पुराच्या विळख्यात अडकली शाळा; पत्त्यांसारखी कोसळली इमारत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात