मुंबई, 17 सप्टेंबर : बऱ्याच जणांकडे क्रेडिट कार्ड असतंच. त्याचा उपयोग शाॅपिंग, पैसे काढणं, बॅलन्स ट्रान्सफर करणं, EMI इत्यादींसाठी केला जातो. पण तुम्हाला हे माहीत आहे का की क्रेडिट कार्डावर अनेक सुविधा मोफत मिळतात. क्रेडिट कार्डाच्या वेलकम किटमध्ये बरीच माहिती उपलब्ध असते. जाणून घेऊ त्याबद्दल- 1. झीरो लायबिलिटी इन्शुरन्स - तुम्हाला क्रेडिट कार्डावर मिळणारी ही सुविधा तुम्ही घेतली पाहिजे. जेव्हा तुमचं क्रेडिट कार्ड हरवतं तेव्हा इन्शुरन्स उपयोगी येतो. तुम्ही फक्त क्रेडिट कार्ड हरवलं की कंपनीला लगेच कळवायचं. सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या, पेट्रोल-डिझेल झालं ‘इतकं’ महाग 2. प्रवासात सामान हरवलं तर इन्शुरन्स - तुम्ही प्रवास करत असाल आणि तुमचं सामान हरवलं तर तुम्ही क्रेडिट कार्डाचा वापर करू शकता. यात तुमच्या विमानप्रवासाचा सर्व खर्च उचलला जातो. फक्त तुमची बॅग हरवली तर 48 तासाच्या आत तुम्हाला रिपोर्ट करायला हवा. महत्त्वाचं म्हणजे याचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला विमान प्रवासाचं तिकीट क्रेडिट कार्ड वापरूनच काढायला हवं. क्लेम करण्यासाठी कार्डहोल्डरला विमानकंपनीकडून ही माहिती मिळणं आवश्यक आहे की तुमची बॅग हरवलीय. त्यानंतर क्लेम रिक्वेस्ट केल्यावर तुम्हाला इन्शुरन्सची रक्कम परत मिळते. दिवाळीच्या आधी सुरू होतेय अमेझाॅनची ‘फेस्टिव यात्रा’, ग्राहकांसाठी ‘या’ ऑफर्स 3. अॅक्सिडेंटल डेथ बेनिफिट - समजा दुर्दैवानं कार्ड होल्डरचा अपघाती मृत्यू झाला तर कार्ड कंपनी आऊटस्टँडिंग बॅलन्स माफ करतात. खरं तर 50 हजार रुपयापर्यंत बॅलन्स माफ होऊ शकतो. पण कोणती कंपनी किती रक्कम माफ करते हे त्या त्या कंपनीवर अवलंबून असतं. जेव्हा कार्ड अॅक्टिव नसतं तेव्हा क्लेमसाठी डेथ सर्टिफिकेट जमा करायला हवं. पर्सनल लोन घेताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, नाही तर द्यावं लागेल जास्त व्याज 4. ट्रिप कॅन्सलेशन इन्शुरन्स - जेव्हा रिफंडेबल फ्लाइटच्या अंतिम मिनिटाला तिकीट रद्द झालं तर ही सुविधा मिळते. सर्ल क्रेडिट कंपन्या हे कव्हर करत नाही. खराब हवामानामुळे विमान रद्द झालं तर मात्र ही सुविधा मिळत नाही. 5. रेंटल कार इन्शुरन्स - तुम्ही तुमची कार भाड्यावर दिली आणि त्या गाडीचा अपघात झाला, नुकसान झालं, तर कार रिपेरिंगचा खर्च तुम्ही क्रेडिट कार्डानं करून क्लेम करू शकता. दुसऱ्या वाहनाचं नुकसान झालं तर क्लेम मिळत नाही. VIDEO: चकाचक बाईक वापरणाऱ्या तरुणानं चोरलं हेल्मेट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.