नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Price) मध्ये झालेल्या घसरणीमुळे जर तुम्ही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. वृत्त संस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच जुने सोने आणि दागिने विकण्यावर जीएसटी (GST) आकारला जाऊ शकतो. केरळचे अर्थमंत्री थॉमस आयसॅक (Thomas Isaac) यांनी शुक्रवारी अशी माहिती दिली आहे की, राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समुह (GOM) मध्ये जुने सोने आणि दागिन्यांच्या विक्रीवर तीन टक्के जीएसटी आकारण्याच्या प्रस्तावाला जवळपास मंजूरी मिळाली आहे.
जाणून घ्या सोने खरेदी आणि विक्री करण्यावर किती कर द्यावा लागेल?
सोनेखरेदीवर किती कर?- बाजारामध्ये सोन्याची किंमत दागिन्याचे वजन आणि कॅरेटप्रमाणे वेगवेगळी असते. मात्र, सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केल्यानंतर त्याची किंमत आणि मेकिंग चार्जवर 3 टक्के जीएसटी आकारला जातो. दागिन्यांची रक्कम तुम्ही कोणत्याही पद्धतीने दिली तरी तुम्हाला जीएसटी द्यावा लागतो.
(हे वाचा-जर तुमचीही एकापेक्षा जास्त बँक खाती आहेत तर सावधान! होऊ शकते मोठे नुकसान)
सोन्याच्या विक्रीवर किती कर?- काही लोकांनाच माहित आहे की, सोने खरेदीबरोरच सोने विक्रीवर देखील कर द्यावा लागतो. सोनेविक्री करताना हे पाहिले जाते की, तो दागिना तुमच्याकडे किती काळापासून आहे, कारण त्या कालावधीनुसार कर लागू होतो. सोन्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (STCG) आणि लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG) कर द्यावा लागतो.
(हे वाचा-कोरोना काळात मोठ्या प्रमाणात झाला या पदार्थाचा खप, तुम्ही देखील करू शकता व्यवसाय)
सोन्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कर तेव्हा आकारला जातो जेव्हा खरेदीच्या तारखेनंतर 3 वर्षांच्या आतमध्ये तुम्ही सोन्याचे दागिने विकता. दागिना विकल्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या रकमेतून इनकम टॅक्सस्लॅबनुसार तुमचा कर कापला जातो. 3 वर्षांपेक्षा जास्त जुने दागिने विकण्यावर लाँग टर्म कॅपिटल गेन कर द्यावा लागतो. यानुसार कराचा दर 20.80 टक्के आहे. मागील अर्थसंकल्पात LTCG वरील सेस 3 टक्क्यांवरून वाढवून 4 टक्के केला होता. टॅक्सच्या दरामध्ये सेसचा समावेश आहे. याआधी सोनेविक्रीवर 20.60 टक्के LTCG लागू होत असे.