• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दराने गाठला रेकॉर्ड, चांदी प्रति किलो 50 हजारांवर

महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दराने गाठला रेकॉर्ड, चांदी प्रति किलो 50 हजारांवर

कोरोना व्हायरस (Coronavirus)च्या संकटकाळात सोन्याच्या किंमती रोज नवनवे रेकॉर्ड रचत आहेत. सोन्याच्या किंमतींनी जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी देखील नवे रेकॉर्ड रचले आहेत

 • Share this:
  नवी दिल्ली, 01 जुलै : कोरोना व्हायरस (Coronavirus)च्या संकटकाळात सोन्याच्या किंमती रोज नवनवे रेकॉर्ड रचत आहेत. सोन्याच्या किंमतींनी जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी देखील नवे रेकॉर्ड रचले आहेत.  एमसीएक्स एक्सचेंजवर ऑगस्टसाठीच्या सोन्याचे भाव 0.4 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे सोन्याच्या किंमती 48,982 रुपये प्रति तोळा झाल्या आहेत, तर चांदीचे भाव देखील 0.8 टक्क्यांनी वाढले आहेत. परिणामी चांदीच्या किंमतीने 50 हजारांचा भाव ओलांडला आहे. चांदीचे भाव प्रति किलो 50,779 रुपये प्रति किलो झाले आहेत. देशांतर्गत सोन्याची किंमत प्रति तोळा 48,825 रुपये झाली आहे. यामध्ये 12.5 टक्के आयात कर आणि 3 टक्के जीएसटीचा देखील समावेश आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जागतिक बाजारपेठेतील सोन्याच्या किंमती आज आठ वर्षांच्या उच्चांकाच्या जवळ पोहोचल्या आहेत. आर्थिक अनिश्चिततेच्या काळामध्ये सुरक्षित असणाऱ्या सोन्याची मागणी वाढली आहे. जागतिक बाजारपेठेत स्पॉट गोल्डची किंमत 0.1 टक्क्यांनी वाढून 1,782.21 डॉलर प्रति औंस झाली आहे. (हे वाचा-'या' मोठ्या बँकेत बचत खाते उघडणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका, वाचा सविस्तर) ऑक्टोबर 2012 मध्ये ही सोन्याने सर्वाधिक किंमत म्हणजे 1785.46 डॉलर प्रति औंस एवढे दर गाठले होते. त्या रेकॉर्डच्या जवळ आजच्या किंमती पोहोचल्या आहेत. लॉकडाऊन काळात सोन्याच्या किंमतीने असे अनेक रेकॉर्ड रचले आहेत परिणामी लवकरच सोन्याच्या किंमती 50 हजारांपेक्षा जास्त होण्याची दाट शक्यता आहे. व्यापाऱ्यांच्या मते कोरोना व्हायरस पँडेमिक, भारत-चीन संघर्ष आणि अमेरिकी बँक फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर न वाढवण्याचा घेतलेला निर्णय, या सर्व कारणांमुळे सोन्याच्या किंमतीचा ग्राफ चढता आहे. जगभरातील मध्यवर्ती  बँकांनी व्याजदर घटवले आहेत.  त्याचप्रमाणे अमेरिका आणि चीन यांमधील तणाव वाढत आहे. य सर्वाचा परिणाम मोठ्या प्रमाणात सोन्याच्या किंमतीवर होत आहे. (हे वाचा-ATMमधून पैसे काढणे आणि बचत खात्यात रक्कम ठेवण्याबाबत आजपासून बदलणार हे नियम) संपादन - जान्हवी भाटकर
  First published: