मुंबई, 19 ऑक्टोबर : ज्या प्रकारे आपण आपल्या दैनंदिन गरजांसाठी धान्य, मसाले, सोने यासारखी कोणतीही वस्तू विकत घेतो, त्याचप्रमाणे या वस्तू शेअर बाजारातही खरेदी आणि विक्री केल्या जातात. शेअर बाजाराच्या कमोडिटी विभागात (Commodity Market) त्यांची खरेदी -विक्री केली जाते त्याला कमोडिटी ट्रेडिंग म्हणतात. हे कंपन्यांच्या शेअर्सच्या ट्रेडिंगपेक्षा थोडे वेगळे आहे. इक्विटी मार्केट. कमोडिटी ट्रेडिंग मुख्यतः फ्युचर मार्केटमध्ये केले जाते. 2003 मध्ये 40 वर्षानंतर भारतात कमोडिटी ट्रेडिंगवरील बंदी उठवण्यात आली.
सर्वसाधारणपणे कमोडिटीटे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. मौल्यवान धातू याते सोने, चांदी आणि प्लॅटिनम यांचा समावेश आहे. बेस मेटलमध्ये तांबे, जस्त, निकेल, शिसे, टिन आणि अॅल्युमिनियम यांचा समावेश होतो. एनर्जीमध्ये क्रुड ऑईल, नॅचरल गॅस, ATF, गॅसोलाईन यांचा समावेळ आहे. तर मसाल्यांमध्ये काळी मिरी, धणे, वेलची, जिरे, हळद आणि लाल मिरची यांचा समावेश होतो. तर इतरमध्ये सोया बियाणे, तेल, गहू, हरभरा या गोष्टी येतात.
कमोडिटी ट्रेडिंगमध्ये काय वेगळे आहे?
कमोडिटी ट्रेडिंग आणि शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये मूलभूत फरक आहे. शेअर बाजारात तुम्ही एकदा शेअर्स खरेदी करू शकता आणि बऱ्याच वर्षांनंतर विकू शकता. पण कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड फक्त दोन-तीन नजीकच्या महिन्यांत केला जातो. म्हणून खरेदी किंवा विक्री करताना विशिष्ट कालावधीचे पालन करणे आवश्यक आहे. हे इक्विटी फ्युचर ट्रेडिंग सारखेच आहे.
कागद नाही तर या पदार्थापासून तयार होतात नोटा; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!
फ्युचर कान्ट्रॅक्ट काय आहे?
भविष्यातील तारखेला आजच्या किंमतीत देवाणघेवाण होणाऱ्या दोन पार्टीमधील हा खरेदी आणि विक्री करार आहे. राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन मॉनिटरिंग आणि सर्विलान्स मॅकेनिज्मद्वारे ट्रेड केला जातो. MCX आणि NCDX मधील कमोडिटी फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स एक महिना, दोन महिने आणि तीन महिन्यांच्या एक्सपायरी सायकलच्या आधारे खरेदी केले जातात.
पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी कमोडिटी गुंतवणूक फायदेशीर
तज्ञांच्या मते, पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणण्यासाठी एखाद्याने इक्विटी तसेच कमोडिटीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. यामुळे किंमतीतील चढउतारांचा लाभ घेता येतो. मात्र किरकोळ आणि लहान गुंतवणूकदारांनी कमोडिटीमध्ये गुंतवणूक करताना अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. बाजारातील अस्थिरता आणि थोडी माहिती सर्व पैसे बुडवू शकतात. गुंतवणूकदारांना मागणी चक्र आणि कोणत्या घटकांचा कमोडिटी बाजारावर परिणाम होतो हे माहित असणे आवश्यक आहे.
Tata चा 'पॉवर'फुल शेअर! गुंतवणूकदारांची 15 दिवस आधीच दिवाळी
कमोडिटी ट्रेडिंगचे फायदे
भारतात वार्षिक 25 लाख कोटी रुपयांच्या उलाढालीसर कमोडिटी मार्केट वेगाने वाढत आहे. हे प्रामुख्याने लीव्हरेज्ड मार्केट आहे. याचा अर्थ लहान आणि मध्यम गुंतवणूकदार देखील मार्जिन मनीद्वारे थोड्या प्रमाणात कमोडिटी ट्रेडिंग करू शकतात.
भारतीय कमोडिटी एक्सचेंजची भूमिका काय आहे?
इंडियन कमोडिटी एक्सचेंज ही कमोडिटी फ्युचर्समध्ये ट्रेडिंगसाठी प्लॅटफॉर्म पुरवणारी संस्था आहे. जसे स्टॉक मार्केट इक्विटीमध्ये ट्रेडिंगसाठी जागा पुरवते. सध्या फ्युचर्स ट्रेडिंगसाठी 95 वस्तू उपलब्ध आहेत जे रेगुलेटर फॉरवर्ड मार्केट कमिशन (FMC) द्वारे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि चौकटीत आहेत. भारतात सध्या 3 राष्ट्रीय आणि 22 क्षेत्रीय एक्सचेंज कार्यरत आहेत.
MCX आणि NCDEX काय आहे?
एमसीएक्स (Multi Commodity Exchange) द्वारे सुलभ केलेल्या कमोडिटी मार्केटमध्ये कमोडिटी ट्रेडिंगला अनेकदा एमसीएक्स ट्रेडिंग असे संबोधले जाते. ज्याप्रमाणे बीएसई आणि एनएसई स्टॉकमध्ये ट्रेडिंगसाठी प्लॅटफॉर्म दिले जाते, त्याचप्रमाणे एमसीएक्स वस्तूंच्या ट्रेडसाठी प्लॅटफॉर्म पुरवते. यामध्ये, मुख्य व्यापार धातू आणि ऊर्जामध्ये केला जातो. यामध्ये, दैनिक विनिमय मूल्य 17,000-20,000 कोटी आहे. एनसीडीईएक्स (National Commodity and Derivatives Exchange) डिसेंबर 2003 मध्ये अस्तित्वात आले. यामध्ये प्रामुख्याने कृषी व्यापार होतो. दैनिक विनिमय मूल्य सुमारे 2000 - 3000 कोटी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.