आता Google Pay द्वारे फ्रीमध्ये नाही करता येणार पैसे ट्रान्सफर, द्यावं लागणार शुल्क

आता Google Pay द्वारे फ्रीमध्ये नाही करता येणार पैसे ट्रान्सफर, द्यावं लागणार शुल्क

तुम्ही जर 'गुगल पे'द्वारे (Google Pay) पैशांचा व्यवहार करत असाल तर तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर: तुम्ही जर 'गुगल पे'द्वारे (Google Pay) पैशांचा व्यवहार करत असाल तर तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असणाऱ्या गुगल पे ने पुढील वर्षी जानेवारीपासून पिअर-टू-पिअर पेमेंट फॅसिलिटी  (Peer to peer payments facility) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदल्यात कंपनीकडून इन्स्टंट मनी ट्रान्सफर  (Instant Money Transfers) पेमेंट सिस्टम देण्यात येणार आहे. ज्याकरता युजर्सना काही शुल्क द्यावे लागेल. दरम्यान हे शुल्क किती असेल याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही आहे.

मीडिया अहवालांच्या मते सध्या Google Pay मोबाइल किंवा pay.google.com वरून पैसे पाठवण्याची आणि पैसे रिसिव्ह करण्याची सुविधा देते. दरम्यान गुगलकडून नोटीस जारी होऊन WEB APP बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परिणामी युजर्स 2021 च्या सुरुवातीपासून Pay.google अॅपच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर नाही करू शकणार. याकरता युजर्सना Google Pay चा वापर करावा लागेल. त्याचप्रमाणे Google कडून हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, Google Pay च्या सपोर्ट पेज देखील पुढील वर्षी जानेवारीपासून बंद केले जाईल.

(हे वाचा-Gold Price Today: लग्नसराईच्या काळात स्वस्त झालं सोनं, चांदीचीही झळाळी उतरली)

जेव्हा तुम्ही एखाद्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवता तेव्हा पैसे हस्तांतरित होण्यास एक ते तीन दिवस लागतात. डेबिट कार्ड वापरून त्वरित हस्तांतरित केले जाते. कंपनीने सपोर्ट पेजना अशी घोषणा केली आहे की, जेव्हा तुम्ही डेबिट कार्डने पैसे पाठवता तेव्हा 1.5 टक्के किंवा 0.31 डॉलर शुल्क आकारले जाते.

(हे वाचा-घराच्या छतावरील मोकळ्या जागेतून कमाईची संधी, काही महिन्यातच मिळतील लाखो)

Google कडून इन्स्टंट मनी ट्रान्सफर करण्यावर चार्ज घेतला जाऊ शकतो. Googe कडून गेल्या आठवड्यात काही फीचर लाँच करण्यात आले आहेत. हे सर्व फीचर अँड्रॉइड आणि ios युजर्ससाठी रोलआउट करण्यात आले आहेत. कंपनीने Google Pay च्या लोगोमध्ये देखील बदल केले आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 24, 2020, 3:35 PM IST
Tags: Google

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading