जाहिरात
मराठी बातम्या / मनी / घराच्या छतावरील मोकळ्या जागेतून कमाईची संधी, काही महिन्यातच मिळतील लाखो; वाचा काय आहे आयडिया

घराच्या छतावरील मोकळ्या जागेतून कमाईची संधी, काही महिन्यातच मिळतील लाखो; वाचा काय आहे आयडिया

घराच्या छतावरील मोकळ्या जागेतून कमाईची संधी, काही महिन्यातच मिळतील लाखो; वाचा काय आहे आयडिया

जर तुमच्या घराचे छत किंवा घरासमोरील अंगण मोकळं असेल, तर तुमच्याकडे कमाईची चांगली संधी आहे. या बिझनेस आयडिया वापरून तुम्ही लखपती होऊ शकता

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर: जर तुमच्या घराचे छत किंवा घरासमोरील अंगण मोकळं असेल, तर तुम्ही या बिझनेस आयडियांचा (New Business Ideas) नक्की विचार करू शकता. या संकल्पना वापरून तुम्ही लखपती होण्याचं स्पप्न पूर्ण करू शकता. हे ठराविक बिझनेस तुम्हाला घर बसल्या लाखो रुपये कमावण्याची संधी देत आहेत. यामध्ये तुम्हाला फार गुंतवणूक देखील करावी लागणार नाही मात्र सावधानता जरूर बाळगावी लागेल. जाणून घ्या कसा सुरू कराल हे व्यवसाय सोलर पॅनेल लावून करा कमाई सरकार देखील या व्यवसायासाठी प्रोत्साहन देत आहे. सोलर प्लँट लावून तुम्ही तुमच्या इमारतीची किंवा घराची केवळ वीज वाचवाल एवढंच नाही तर चांगली कमाई देखील करता येईल. टेरेस फार्मिंगद्वारे कमाई याशिवाय तुम्ही टेरेस फार्मिंग करून देखील कमाई करू शकता. इमारतीच्या छतावर तुम्हाला ग्रीन हाऊस बनवावे लागेल. ज्याठिकाणी पॉलिबॅगमध्ये भाज्या, फुलं किंवा इतर प्रकारची रोपं लावली जातात. याठिकाणी ड्रिप प्रणालीने सतत सिंचन देखील करावं लागेल. या संकल्पनेत तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. (हे वाचा- मोदी सरकार 2 वर्षांपर्यंत भरणार तुमचा PF, वाचा कुणाला होणार फायदा) होर्डिंग्ज लावून देखील कमावता येतील पैसे जर तुमची इमारत अशा ठिकाणी आहे जी लांबूनही दिसते किंवा मुख्य रस्त्याशेजारी आहे तर तुम्ही तुमच्या छतावर होर्डिंग्ज लावून चांगली कमाई करू शकता. शहरांमध्ये अशा अॅड एजन्सी असतात ज्या आऊटडोर अॅडव्हरटायझिंगचं काम करतात. (हे वाचा- केवळ 1000 रुपयांची गुंतवणूक आणि लाखोंची कमाई, हे आहेत सर्वात बेस्ट पर्याय) तुम्ही या एजन्सींशी संपर्क साधू शकता. या एजन्सी आवश्यक परवानगी घेऊन तुमच्या छतावर होर्डिंग्ज लावतील. मात्र एजन्सीकडे आवश्यक परवानगी किंवा क्लिअरन्स आहे की नाही हे तुम्ही तपासून घेणे आवश्यक आहे, अन्यथा तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तुमची प्रॉपर्टी कोणत्या ठिकाणी आहे यावरून होर्डिंगची किंमत ठरते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात