मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /गुगलचा युजर्सना झटका; `ही` सुविधा लवकरच होणार बंद

गुगलचा युजर्सना झटका; `ही` सुविधा लवकरच होणार बंद

गुगलचा युजर्सना झटका; `ही` सुविधा लवकरच होणार बंद

गुगलचा युजर्सना झटका; `ही` सुविधा लवकरच होणार बंद

तुम्ही जर गुगलच्या वेगवेगळ्या सुविधांचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ही कंपनी त्यांची Google Stadia ही सुविधा लवकरच बंद करणार आहे. मात्र ही सुविधा बंद झाल्याने फारसा परिणाम होणार नाही, त्यामुळे युजर्सनं घाबरून जाऊ नये, असं कंपनीनं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे गुगलने जीमेल बाबतही एक नवी अपडेट दिली आहे.

पुढे वाचा ...
 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 9 जानेवारी: इंटरनेट आणि गुगल हे समीकरण सर्वश्रुत आहे. कोणत्याही गोष्टीचे संदर्भ शोधणं असो अथवा ईमेल करणं, युजर्सचा याकरिता गुगलचा प्राधान्यानं वापर करतात. गुगलने देखील युजर्ससाठी ट्रान्सलेशन, क्लाउड, ऑनलाइन मीटिंगसाठी गुगल मीट सारख्या खास सुविधा दिलेल्या आहेत. रोज लाखो युजर्स गुगलच्या वेगवेगळ्या सुविधा वापरतात. तुम्ही जर गुगलच्या वेगवेगळ्या सुविधांचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ही कंपनी त्यांची Google Stadia ही सुविधा लवकरच बंद करणार आहे. मात्र ही सुविधा बंद झाल्याने फारसा परिणाम होणार नाही, त्यामुळे युजर्सनं घाबरून जाऊ नये, असं कंपनीनं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे गुगलने जीमेल बाबतही एक नवी अपडेट दिली आहे.

  अमेरिकी टेक जायंट असलेली गुगल ही कंपनीकडून दोन महत्त्वाचे अपडेट देण्यात आले आहेत. यापैकी पहिला अपडेट गुगल स्टाडिया या सुविधेविषयी तर दुसरा अपडेट जीमेल बाबत आहेत.

  एका वृत्तानुसार, गुगल आता वेब ब्राउजरवरील जीमेलवर एंड-टू -एंट एन्क्रिप्शन लागू करणार आहे. सध्या ही सुविधा केवळ बीटा युजर्ससाठी देण्यात येत आहे. यामुळे तुम्ही एन्क्रिप्टेड ईमेल सेंड आणि रिसीव्ह करू शकाल. ईमेल आणि अ‍ॅटचमेंट या गोष्टी इनलाइन इमेजसह एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतील, असं गुगलने सांगितलं आहे. अशी सुरक्षा तुम्हाला सध्या व्हॉट्सअ‍ॅप, सिग्नल आणि अन्य इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅपवर मिळते. येत्या काळात ही सुरक्षा जीमेलवरही मिळेल. पण यासाठी युजर्स अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

  हेही वाचा: नादच करायचा नाय! पठ्ठ्याने पाळलाय तब्बल 20 कोटींचा Dog; खासियत काय तुम्हीच पाहा

  दरम्यान, गुगल लवकरच एक सुविधा बंद करणार आहे. 18 जानेवारी 2023 नंतर गुगल स्टाडिया बंद करण्यात येणार आहे. गुगलने ऑक्टोबर 2018 मध्ये ही सुविधा क्लोज बीटा व्हर्जनमध्ये सुरू केली होती. नोव्हेंबर 2019 पासून ही सुविधा सर्व युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. गुगलची हा प्लॅन फसला आणि आता ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. `द व्हर्ज`च्या वृत्तानुसार, अनेक पब्लिशनने गेम्स दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर शेअर कशा करायच्या, याची पद्धत सांगितली आहे. त्यामुळे आता गुगल स्टाडियावर सेव्ह असलेल्या गेम आणि टायटल्स युजर्स गमावणार आहेत.

  एका अहवालानुसार, अमेरिकी टेक्नॉलॉजी कंपनी गुगल स्टोअरवरून खरेदी केलेल्या स्टाडिया हार्डवेअरचा रिफंड देत आहे. याशिवाय स्टाडिया स्टोअरवरून खरेदी करण्यात आलेल्या अ‍ॅड-ऑन परचेज आणि गेम्ससाठीचा रिफंड देखील कंपनी देत आहे. कंपनीने रिफंड जारी केला असून बहुतांश युजर्सला 18 जानेवारी 2023 पर्यंत तो मिळेल. मात्र याचा सामान्य युजर्सवर कोणाताही परिणाम होणार नाही, त्यामुळे युजर्सने घाबरून जाण्याचे कारण नाही, असं कंपनीने सांगितलं आहे.

  First published:

  Tags: Google