जाहिरात
मराठी बातम्या / मनी / LIC गुंतवणूकदारांसाठी गुडन्यूज! कंपनी डिव्हिडंट अन् बोनस शेअर वाटण्याच्या तयारीत, वाचा डिटेल्स

LIC गुंतवणूकदारांसाठी गुडन्यूज! कंपनी डिव्हिडंट अन् बोनस शेअर वाटण्याच्या तयारीत, वाचा डिटेल्स

LIC गुंतवणूकदारांसाठी गुडन्यूज! कंपनी डिव्हिडंट अन् बोनस शेअर वाटण्याच्या तयारीत, वाचा डिटेल्स

LIC गुंतवणूकदारांसाठी गुडन्यूज! कंपनी डिव्हिडंट अन् बोनस शेअर वाटण्याच्या तयारीत, वाचा डिटेल्स

LIC Share: एलआयसी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश किंवा बोनस शेअर्सची घोषणा करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉलिसीधारकांच्या निधीतून सुमारे 22 अब्ज डॉलर्स यासाठी राखून ठेवलेल्या निधीमध्ये हस्तांतरित करण्याची योजना आखली जात आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 ऑक्टोबर: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आपल्या भागधारकांना लाभांश किंवा बोनस समभाग जारी करण्याची योजना आखत आहे. याबाबतची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी सांगितले की एलआयसी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश किंवा बोनस शेअर्स देण्याची घोषणा करू शकते. यासाठी राखून ठेवलेल्या निधीमध्ये पॉलिसीधारकांच्या निधीतून सुमारे 22 अब्ज डॉलर हस्तांतरित करण्याची योजना आखली जात आहे. वास्तविक LIC आपल्या शेअर्सच्या किमती सुधारण्यासाठी हे पाऊल उचलण्याच्या विचारात आहे. जेणेकरून गुंतवणूकदारांचा समभागावरील विश्वास अबाधित राहील. एलआयसीचा शेअर या वर्षी मे महिन्यात शेअर बाजारात लिस्ट झाला होता. सूचीबद्ध झाल्यापासून स्टॉकमध्ये 35 टक्केपेक्षा जास्त घसरण झाली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे 2.23 अब्ज रुपयांचं नुकसान झालं आहे. हेही वाचा:  विमा कंपनी तुमच्या तक्रारीकडे लक्ष देत नाही, अशी घडवा अद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नाही- या प्रकरणाची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, एलआयसी पॉलिसीधारकांच्या फंडातून सुमारे 22 अब्ज डॉलर्स एलआयसी निर्धारित फंडात हस्तांतरित करण्याची योजना आखत आहे. हा निधी नॉन पार्टिसिपेट निधीचा एक षष्ठांश भाग असू शकते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या एकूण मालमत्तेत सध्याच्या 105 अब्ज रुपयांच्या मूल्यापेक्षा सुमारे 18 पटीने वाढ होईल. तथापि एलआयसी आणि अर्थ मंत्रालयानं अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही. या संदर्भात वृत्तसंस्था रॉयटर्सच्या ई-मेलला उत्तर दिलं गेलं नाही.  LIC चे शेअर्स 17 मे रोजी लिस्ट झाले होते- भारतीय आयुर्विमा महामंडळ या वर्षी 17 मे रोजी शेअर बाजारात सूचिबद्ध झाले. लिस्टिंग झाल्यापासून समभागात सातत्यानं घसरण होत राहिली. आयपीओच्या इश्यू किंमतीत एलआयसीचा शेअर 949 रुपयांची पातळीही गाठू शकला नाही. शुक्रवारी शेअर 592.50 रुपयांवर बंद झाला.

News18लोकमत
News18लोकमत

एलआयसी शेअर्समधील सातत्यानं होणाऱ्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर एलआयसी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश किंवा बोनस शेअर्सची घोषणा करू शकते. या निर्णयामुळं गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार आहे. त्यातून एलआयसीमध्ये गुंतवणूक करण्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा कंपनीचा प्रयत्न एलआसीकडून केला जात आहे. लवकरच एलआयसीकडून याची घोषणा होऊ शकते, अशी माहिती सुत्रांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात