जाहिरात
मराठी बातम्या / मनी / विमा कंपनी तुमच्या तक्रारीकडे लक्ष देत नाही, अशी घडवा अद्दल

विमा कंपनी तुमच्या तक्रारीकडे लक्ष देत नाही, अशी घडवा अद्दल

विमा कंपनी तुमच्या तक्रारीकडे लक्ष देत नाही, अशी घडवा अद्दल

विमा कंपनी तुमच्या तक्रारीकडे लक्ष देत नाही, अशी घडवा अद्दल

कंपनीने विमाधारकाचा दावा स्वीकारण्यास नकार दिल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं आणि ऐकलं असेल. अशा परिस्थितीत काही ग्राहक फक्त सोशल मीडियावर त्यांचे म्हणणे शेअर करतात, परंतु तुम्ही प्रथम विमा कंपनीच्या तक्रार निवारण शाखेत जा आणि काही काम न झाल्यास IRDA कडे तक्रार करायला हवी.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 सप्टेंबर: कोरोना महामारीनंतर अनेक लोक विम्याच्या बाबतीत सजग झाले आहेत. आता केवळ विमा उत्पादनांची मागणी वाढली नाही तर आधीच विमा उतरवलेल्या ग्राहकांचे दावेही वाढले आहेत. यादरम्यान अशी हजारो प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात कंपन्यांनी ग्राहकांचे दावे फेटाळले आहेत. जर तुमच्यासोबतही असं घडलं असेल आणि कंपनी तुमच्या तक्रारींकडे लक्ष देत नसेल, तर तुम्ही तुमचं म्हणणं कोणत्या व्यासपीठावर मांडावं, असा प्रश्न पडतो. बहुतेक विमाधारकांना जेव्हा अशी समस्या उद्भवते तेव्हा सोशल मीडियावर त्यांचे मत व्यक्त करतात किंवा कंपनीकडे तक्रार करतात. परंतु तज्ञांचे म्हणणं आहे की समस्या सोडवण्याचा हा योग्य मार्ग नाही. कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी ग्राहक सेवा क्रमांक देखील जारी करतात, बहुतेक प्रकरणांमध्ये हे प्लॅटफॉर्म जास्त मदत करत नाहीत. ग्राहक सेवा अधिकारी या फोन कॉलद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात अयशस्वी ठरतात. IRDAने केली आहे व्यवस्था - विमा क्षेत्रातील तज्ज्ञ मनोज जैन म्हणतात की भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (Irdai) ग्राहकांच्या या गरजा लक्षात घेऊन तक्रार निवारणासाठी मजबूत व्यवस्था केली आहे. तुम्हाला विमा कंपनीबाबत काही समस्या असल्यास तुम्ही IRDA किंवा विमा लोकपालकडे तक्रार करू शकता. या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून ग्राहकांना त्यांच्या समस्येचं त्वरित समाधान मिळतं. हेही वाचा:  SBI च्या विशेष एफडी योजनेची मुदत ‘या’दिवशी संपणार; ग्राहकांना सर्वात जास्त व्याजदर देते उत्सव डिपॉझिट स्कीम आपण काय करावे? तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये कोणतीही समस्या आल्यास, विमाकर्ता कंपनीच्या तक्रार निवारण शाखेला मेल करू शकता. तुमच्या जिल्ह्याच्या विमा लोकपालाकडेही तक्रार करता येईल. तुम्ही सर्व विमा कंपन्यांना policyholder.gov.in वर ईमेल करू शकता. तसेच तुमच्या तक्रारीसह सर्व प्रकारच्या स्लिप आणि इतर कागदपत्रे मेल करा.

News18लोकमत
News18लोकमत

तुम्ही पोस्टाद्वारे तक्रार पाठवू शकता- ग्राहकांना हवं असल्यास ते त्यांची तक्रार पोस्टाद्वारे IRDA कडे पाठवू शकतात. यासाठी तुम्ही प्रथम तक्रार फॉर्म डाउनलोड करा, नंतर तो भरा आणि तुमची तक्रार संबंधित कागदपत्रांसह IRDA च्या पत्त्यावर पाठवा. तुमची तक्रार IRDA च्या ग्राहक व्यवहार विभागाच्या तक्रार निवारण शाखेकडे पाठवावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: insurance
  • First Published :
जाहिरात
जाहिरात