जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘कोंकण हे फक्त मजा करण्यासाठी नाही’; भरत जाधव मागतोय मदतीचा हात

‘कोंकण हे फक्त मजा करण्यासाठी नाही’; भरत जाधव मागतोय मदतीचा हात

‘कोंकण हे फक्त मजा करण्यासाठी नाही’; भरत जाधव मागतोय मदतीचा हात

पावसामुळे होरपळलेल्या कोकणस्थांना मदत करण्यासाठी या क्रमांकावर फोन करा; भरत जाधव करतोय मदतीची विनंती

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 24 जुलै**:** गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतोय. (Heavy rainfall) या पावसामुळे राज्यातील लोकांची जणू झोपच उडाली आहे. सगळीकडे पाणीच पाणी अशी अवस्था झाली आहे. कधीनव्हे ते यावर्षी कोकणात देखील पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. (Heavy rainfall konkan) तेथील लोकांचं आयुष्य विस्कळीत झालं आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कोकणी माणसाला मदतीचा हात द्या अशी विनंती प्रसिद्ध मराठी अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav) याने केली आहे. भरत जाधवने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने मदतीची विनंती केली आहे. ही पोस्ट शेअर करताना भरतने लिहिले आहे, “आपले कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरते नाही. या पूरसंकटात आपापल्या परीने शक्य ती कोकणाला साथ द्या” या पोस्टमध्ये जास्त दिवस टिकतील असे सुके पदार्थ, किराणा सामान, महिला व पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची अंतर्वस्त्रे, अंथरुण-पांघरूण म्हणून वापरता येणारी जाड कपडे अशा विविध प्रकारे मदत करण्यासाठीची माहिती यावर दिलेली आहे. सोबतच संपर्क क्रमांकसुद्धा दिले आहेत. बबिताला ‘तारक मेहता’मधून दाखवला बाहेरचा रस्ता? निर्मात्यांचा मोठा खुलासा

जाहिरात

अभिनेत्रीनं केली पोलीस तक्रार; राज कुंद्रामुळे मिळत होती जीवे मारण्याची धमकी रत्नागिरीत पावसाचं रौद्ररूप**;** नदीवरील पूल गेला वाहून रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी 7 मीटर असून सध्या ती 8 मीटर वरून वाहते आहे. वशिष्टी नदीची धोका पातळी 7 मीटर असून ती 7.8 मीटर वरून वाहते आहे. काजळी नदी धोका पातळीच्या 1.74 मीटर वरून वाहत असून कोदवली, शास्त्री, बावनदी या नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. यामुळे खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर या शहरे व परिसरातील गावांमध्ये शासकीय यंत्रणांनी नागरिकांना हलविणे, स्थलांतर करणे व इतर मदत कार्य जोरात सुरु केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात