मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Aadhar मध्ये किती वेळा बदलता येईल नाव, पत्ता आणि DOB? वाचा कोणती कागदपत्रं आवश्यक

Aadhar मध्ये किती वेळा बदलता येईल नाव, पत्ता आणि DOB? वाचा कोणती कागदपत्रं आवश्यक

Aadhar Card Update: आधार कार्ड विविध कारणांसाठी एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. अनेक योजनांचा फायदा मिळवण्यासाठी, एखादा आवश्यक फॉर्म भरण्यासाठी आधार महत्त्वाचे असते. जाणून घ्या आधारमध्ये तुम्ही किती वेळा अपडेट करू शकता.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 02 जुलै: आधार कार्ड (Aadhar Card) विविध कारणांसाठी एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. अनेक योजनांचा फायदा मिळवण्यासाठी, एखादा आवश्यक फॉर्म भरण्यासाठी आधार महत्त्वाचे असते.  मात्र काही वेळा आधार कार्डवरील माहिती चुकीची असते किंवा काही मजकूर चुकीचा टाइप झालेला असतो. अशावेळी आधार कार्ड अपडेट (Update Aadhar Data) करणं गरजेचं आहे. शिवाय हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे की तुम्ही किती वेळा आधार कार्डवरील नाव, पत्ता, लिंग किंवा जन्मतारीख बदलू शकता. जाणून घ्या आधारमध्ये तुम्ही किती वेळा अपडेट करू शकता. शिवाय आधार कार्डमध्ये बदल करण्यासाठी कोणती कागदपत्र गरजेची आहेत.

आधार कार्डावरील डेटा किती वेळा बदलता येईल?

नाव- दोन वेळा बदलता येईल

लिंग- एकदा बदलता येईल

जन्मतारीख- चुकीची जन्मतारीख एकदा बदलता येईल

ऑनलाइन अपडेटसाठी कोणती कागदपत्र आवश्यक?

नाव बदलण्यासाठी - ओळखपत्राची स्कॅन केलेली प्रत

कागदपत्र-

पासपोर्ट

Pan Card

रेशन/पीडीएस फोटो कार्ड

मतदात ओळख पत्र

ड्राइव्हिंग लायसन्स

पीएसयूद्वारे जारी सरकारी फोटो ओळखपत्र/ सेवा फोटो ओळख पत्र

नरेगा जॉब कार्ड

मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेद्वारे जारी फोटो आयडी

शस्त्र लायसन्स

फोटो बँक एटीएम कार्ड

फोटो क्रेडिट कार्ड

पेंशनधारकाचं फोटो कार्ड

स्वातंत्र्य सेनानी फोटो कार्ड

शेतकरी फोटो पासबुक

सीजीएचएस/ईसीएचएस फोटो कार्ड

जन्मतारीख बदलण्यासाठी- जन्मतारखेच्या प्रूफची स्कॅन कॉपी

कागदपत्र-

जन्माचा दाखला

एसएसएलसी बुक/सर्टिफिकेट

पासपोर्ट

नोंदणी/अपडेटसाठी यूआयडीएआय प्रमाणपत्राच्या फॉर्मेटवर ग्रुप ए राजपत्रित अधिका-याने जारी केलेले जन्म तारखेचे प्रमाणपत्र

मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेद्वारे जारी फोटो आयडी

पॅन कार्ड

कोणताही सरकारी बोर्ड किंवा विद्यापीठाद्वारे जारी मार्कशीट

सरकारी फोटो ओळख पत्र/पीएसयूद्वारे जारी करण्यात आलेलं ओळखपत्र ज्यामध्ये जन्मतारीख असेल किया गया फोटो पहचान पत्र जिसमें जन्म तिथि हो

केंद्रीय/राज्य पेन्शन देय आदेश

पत्ता बदलण्यासाठी खालीलपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट

पासपोर्ट

बँक स्टेटमेंट/पासबुक

पोस्ट ऑफिसमधील खात्याचा तपशील/ पासबुक

रेशन कार्ड

मतदान ओळखपत्र

ड्राइव्हिंग लायसन्स

पीएसयूद्वारे जारी सरकारी फोटो ओळखपत्र/ सेवा फोटो ओळख पत्र

वीज बिल (3 महिन्यापेक्षा जुनं नको)

पाणीपट्टी (3 महिन्यापेक्षा जुनं नको)

टेलिफोन लँडलाइन बिल (3 महिन्यापेक्षा जुनं नको)

संपत्तीची पावती (1 वर्षापेक्षा जुनी नको)

क्रेडिट कार्ड स्टेटमेंट (3 महिन्यापेक्षा जुनं नको)

विमा योजना

नरेगा जॉब कार्ड

पेंशनर कार्ड

स्वातंत्र्य सेनानी कार्ड

शेतकरी पासबुक

सीजीएचएस/ईसीएचएस कार्ड

आयकर निर्धारण आदेश

वाहन नोंदणी प्रमाणपत्र

First published:

Tags: Aadhar card, Aadhar card link, Aadhar card on phone