नवी दिल्ली, 08 सप्टेंबर: शेतकऱ्यांसाठी आनंदाची (Good News for Farmers) बातमी आहे. नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान, मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गहू, हरभरा, मसूर, मोहरीसह 6 रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी वाढ) वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन एमएसपी रब्बी पिकांच्या मार्केटिंग सीझन 2022-23 (आरएमएस 2023) साठी लागू होईल. कोणत्या पिकासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने किती एमएसपी वाढवली आहे हे जाणून घ्या...
विपणन वर्ष 2022-23 साठी मंत्रिमंडळाने गव्हाच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 40 रुपयांची वाढ करून ती 2015 रुपये केली आहे. याशिवाय हरभऱ्याची किमान आधारभूत किंमत 130 रुपयांनी वाढवून 5,100 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे.
हे वाचा-पगारवाढीसाठी राहा तयार, या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणार जबरदस्त Salary Hike
केंद्रीय मंत्रिमंडल ने रबी विपणन मौसम (आरएमएस) 2022-23 के लिए सभी अधिदेशित रबी फसलों के लिए न्यूनतम समर्थन मूल्य (एमएसपी) में वृद्धि को मंजूरी दी#CabinetDecisions #MSPhaiAurRahega pic.twitter.com/isCg8EHEuN
— पीआईबी हिंदी (@PIBHindi) September 8, 2021
यावेळी तेलबियांमध्ये जास्तीत जास्त वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने मोहरीच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 400 रुपयांनी वाढ करून 4,650 रुपये करण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर मसूरही 400 रुपयांनी वाढून 5,100 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. बार्लीची एमएसपी 1600 रुपयांवरून 1635 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सूर्यफुलावरील एमएसपी 114 रुपये प्रति क्विंटलने वाढवून 5,327 रुपये प्रति क्विंटल केली आहे.
हे वाचा-सरकारी योजनेत 12 हजार द्या आणि 4 कोटी मिळवा! RBI चा असा मेसेज आला आहे का?
केंद्र सरकारच्या मते, रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये विपणन वर्ष 2022-23 साठी केलेली वाढ 2018-19 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांनुसार आहे. तेव्हा सरकारने जाहीर केले होते की पिकांसाठी किमान आधारभूत किंमत ही खर्चाच्या किमान दीडपट इतकी केली जाईल. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला रास्त भाव मिळेल आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल. अंदाजानुसार, एमएसपी वाढवल्यानंतर शेतकऱ्यांना मोहरीसाठी खर्चाच्या तुलनेत 100% लाभ मिळेल. तर मसूरवर 79 टक्के, हरभऱ्यावर 74 टक्के आणि सूर्यफुलावर 50 टक्के लाभ मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.