जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Good News! पगारवाढीसाठी राहा तयार, या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणार जबरदस्त Salary Hike

Good News! पगारवाढीसाठी राहा तयार, या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणार जबरदस्त Salary Hike

Salary Hike

Salary Hike

कोरोना महामारीने सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थांचं (Economy during Coronavirus Pandemic) कंबरडं मोडलं. त्यानंतर हळूहळू आता त्यात सुधारणा होऊ लागली आहे. कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ देखील मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 08 सप्टेंबर: कोरोना महामारीने सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थांचं (Economy during Coronavirus Pandemic) कंबरडं मोडलं. त्यानंतर हळूहळू आता त्यात सुधारणा होऊ लागली आहे. भारतीय अर्थव्यवस्थाही आता हळूहळू उभी राहते आहे. लॉकडाऊनमुळे बंद पडलेलं उद्योगचक्र आता वेग धरतंय आणि पुन्हा सगळीकडे जिवंतपणा जाणवू लागला आहे. या आधी लॉकडाऊनमुळे सगळं उद्योगक्षेत्रही मृतवत वाटत होतं. आता नोकऱ्या उपलब्ध होत आहेत आणि ज्यांच्या नोकऱ्या टिकून आहेत त्यांना चांगली पगार वाढ मिळण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. एका सर्वेक्षणानुसार भारतातील 97.5 टक्के कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारांत सरासरी 8.8 टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये भारतातील कर्मचाऱ्यांना सरासरी 9.4 टक्के पगारवाढ मिळू शकते असंही सर्वेक्षणाचं म्हणणं आहे. मंगळवारी 7 सप्टेंबर 2021 ला कन्सल्टिंग फर्म एऑन कंपनीने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक पगार वाढ अहवालातून या बाबी समोर आल्या आहेत. हे वाचा- आज किती रुपयांत खरेदी करता येणार पेट्रोल-डिझेल? इथे वाचा लेटेस्ट दर कन्सल्टिंग फर्म एऑनने भारतातील 1350 कंपन्यांमध्ये हे सर्वेक्षण केलं असून ही पगार वाढ 2018 मध्ये दिल्या गेलेल्या 9.5 टक्क्यांच्या सरासरी पगार वाढीपेक्षा अधिक आहे असं म्हटलं आहे. कंपन्यांनी 2011 ते 2017 पर्यंत दोन अंकी सरासरी पगार वाढ दिल्यानंतर 2017 मध्ये ही टक्केवारी 9.3 टक्क्यांवर आली होती. त्यानंतर 2018 मध्ये 9.5 टक्के, 2019 मध्ये 9.3 टक्के, 2020 मध्ये 6.1 टक्के तर 2021 मध्ये ही टक्केवारी 8.8 टक्क्यांवर आली होती. विविध औद्योगिक क्षेत्रांतील कंपन्यांना सकारात्मस व्यवसाय वाढ होईल अशी जबरदस्त आशा आहे. त्यामुळेच बहुतांश कंपन्या 2021-22 मध्ये चांगली सरासरी पगार वाढ देऊ शकतील असं या सर्वेक्षणात म्हटलं आहे. 2021 मध्ये मनुष्यबळाची प्रचंड मागणी असल्याने 7.7 टक्के पगार वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला होता पण ही वाढ 8.8 टक्क्यांपर्यंत पोहोचली. अर्थव्यवस्था हळूहळू मार्गावर येत होती आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करायला उद्योग सज्ज झाले होते त्यामुळे त्यांना व्यवसायवृद्धी साधता आली. चांगलं काम करणाऱ्यांना सरासरी 1.7 टक्के पगार वाढ देण्याची इच्छा कंपन्यांनी व्यक्त केल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे. 2022 या वर्षांत तंत्रज्ञान कंपन्या सरासरी 11.2 टक्के, ई-कॉमर्स कंपन्या सरासरी 10.6 टक्के तर आयटी लाइफ सायन्स, फार्मा, कंझ्युमर गुड्स कंपन्या सरासरी 9.2 ते 9.6 टक्के पगार वाढ देण्याची शक्यता आहे. रियल इस्टेट क्षेत्र 8.8, हॉस्पिटॅलिटी क्षेत्र 7.9, इंजिनीअरिंग डिझायनिंग सेवा क्षेत्र 7.7 टक्के सरासरी पगारवाढ देईल. तसंच उर्जा क्षेत्रात गेल्यावर्षाच्या तुलनेत पगार कमी होऊन सरासरी पगारवाढ 8.2 टक्क्यांवरून 7.7 टक्क्यांवर येणार आहे, असं सर्वेक्षणातलं निरीक्षण आहे. हे वाचा- सरकारी योजनेत 12 हजार द्या आणि 4 कोटी मिळवा! RBI चा असा मेसेज आला आहे का? एऑन ह्यूमन कॅपिटल बिझनेसचे भागीदार रुपांक चौधरी म्हणाले, ‘कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेनंतरही भारतीय उद्योगांनी लवचिकपणा दाखवत चांगली कामगिरी केली आहे. भारतात महामारीचं प्रमाण मोठं असूनही कंपन्यांनी 2022 साठी व्यक्त केलेली व्यवसाय वृद्धीची भावना आणि पगार वाढीची शक्यता यामुळे कंपन्यांचा विकास होत असल्याचं सिद्ध होत आहे.’ एऑनचे ज्येष्ठ अधिकारी जंग बहादूर सिंह म्हणाले,‘सगळ्या उद्योगांत सकारात्मकता असून भारत इंड रिकव्हरीच्या दिशेने चालला आहे. बहुतांश कंपन्या आधीच्या तुलनेत चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे.’

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात