नवी दिल्ली, 20 ऑगस्ट: नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी आहे. नोकरदार वर्गाला लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. पीएमची आर्थिक सल्लागार समिती (EAC) ने असा प्रस्ताव दिला आहे की, देशामध्ये काम करणाऱ्या नोकरदार वर्गासाठी काम करण्याचे वय वाढवण्यात यावे. निवृत्तीचे वय वाढण्यासह यूनिव्हर्सल पेन्शन सिस्टिम लागू करण्यात यावी, असा प्रस्ताव देखील देण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास नोकरदार वर्गाला मोठा फायगा मिळू शकतो.
EAC च्या मते, नोकरदार वर्गाला कमीत कमी 2000 रुपयांचे वेतन दरमहा देण्यात यावे. शिवाय आर्थिक सल्लागार समितीने देशभरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगली प्रणाली उपलब्ध करून देण्यास समर्थन दिले आहे.
हे वाचा-Gold Price: सोन्यामध्ये तेजी येऊनही 9000 रुपयांनी कमी आहेत दर, चांदीही वधारली
वर्ल्ड पॉप्यूलेशन प्रॉस्पेक्ट्स 2019 च्या मते 2050 पर्यंत भारतात जवळपास 32 कोटी ज्येष्ठ नागरिक असतील. ही संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 19.5 टक्के असणार आहे. 2019 मध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के अर्थात जवळपास 14 कोटी नागरिक ज्येष्ठ नागरिकांच्या कॅटेगरीमध्ये आहेत. सरकारने निवृत्तीचे वय वाढवण्यासंदर्भात निर्णयाला मंजुरी दिल्यास कोट्यवधी नागरिकांसाठी फायद्याचे ठरणार आहे.
हे वाचा-Fixed Deposit: बँक की Post Office कुठे मिळेल एफडीवर सर्वाधिक व्याज? वाचा सविस्तरस्कील डेव्हलपमेंटवर भर
या अहवालात असा प्रस्ताव देण्यात आला आहे की, केंद्र आणि राज्य सरकारने अशी धोरणं आखली पाहिजेत ज्यामध्ये स्कील डेव्हलपमेंटवर अधिक भर दिला जाईल. या प्रयत्नात असंघटित क्षेत्र, दुर्गम भागात राहणाऱ्या सर्व लोकांचा समावेश करावा.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.