• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • 6.5 कोटी नोकरदारांना दिवाळीआधी मिळणार Good News! PF खात्यात लवकरच येणार व्याजाचे पैसे; अशाप्रकारे तपासा बॅलन्स

6.5 कोटी नोकरदारांना दिवाळीआधी मिळणार Good News! PF खात्यात लवकरच येणार व्याजाचे पैसे; अशाप्रकारे तपासा बॅलन्स

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या (Employee Provident Fund Organization) सदस्यांसाठी आनंदाची बातमी आहे. EPFOच्या सेंट्रल बोर्डाने 8.5% टक्के दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 21 सप्टेंबर: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या (Employee Provident Fund Organization) सदस्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ईपीएफओ सदस्यांना लवकरच पीएफवर व्याज मिळणार आहे. दिवाळीआधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पीएफवरील व्याजाचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. EPFO चे 6.5 कोटी सब्सक्रायबर्स पीएफवरील व्याजाच्या रकमेच्या (Interest on PF amount) प्रतीक्षेत आहेत. EPFOच्या सेंट्रल बोर्डाने 8.5% टक्के दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम दिवाळीआधी कर्मचाऱ्यांना मिळू शकते. मीडिया अहवालाच्या मते, अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली आहे की सरकारकडून जेव्हा कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना त्यांच्या खात्यात महागाई भत्ता मिळेल त्याचवेळी EPFO व्याजाची रक्कमही त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली जाईल. EPFOच्या सेंट्रल बोर्डाने 8.5% टक्के दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. EPFO ने 8.5% व्याजावर अर्थ मंत्रालयाची मंजुरी मागितली आहे. आता अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की सरकारकडून लवकरच यावर शिक्कामोर्तब केले जाईल. फिस्कल ईयर 2020-2021साठी EPFO ला जशी अर्थ मंत्रालयाकडून 8.5% व्याजासाठी मंजुरी मिळेल तसं लगेच कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जाताील. त्यामुळे दिवाळी आधी हे पैसे खात्यात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हे वाचा-Petrol Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, काय आहेत महत्त्वाच्या शहरातील भाव? दरम्यान तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासायची असेल तर काही सोप्या पद्धती वापरून तुम्ही ही रक्कम तपासून शकता. अगदी घरबसल्या एसएमएस पाठवून देखील तुम्ही तुमचा पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता.  याकरता तुम्हाला तुमचा यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) माहित असणं आवश्यक आहे. तुम्हा रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरुन मेसेज पाठवून PF Balance तपासता येईल. जाणून घ्या घरबसल्या पीएफ तपासण्याच्या पद्धती कोणत्या आहेत. 1. SMS च्या माध्यमातून जाणून घ्या पीएफ बॅलन्स SMS च्या माध्यमातून तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्हाला हा मेसेज करावा लागेल. ENG म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. परंतू तुम्हाला अन्य कोणत्या भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेची पहिली तीन अक्षरं तुम्हाला टाकावी लागतील. हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मलयाळम आणि बंगाली भाषेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी ईपीएफओ मध्ये तुमचा नंबर रजिस्टर्ड असणे अनिवार्य आहे. हे वाचा-Gold Price Today:आज पुन्हा सोने दरात घसरण,2 आठवड्यात 1200 रुपये स्वस्त झालं सोनं 2. Missed Call च्या माध्यमातून जाणून घ्या PF Balance यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ईपीएफओ UAN सेवा प्रदान करते, ज्याद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक पाहू शकता 3. Umang App च्या माध्यमातून याकरता तुमचे उमंग App (Unified Mobile Application for New-age Governance) उघडा आणि ईपीएफओवर क्लिक करा. तुम्हाला एका वेगळ्या पेजवर इम्प्लॉयी-सेंट्रिक सर्विस (employee-centric services) वर क्लिक करावे लागेल. याठिकाणी व्ह्यू पासबुकवर क्लिक करा आणि तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्ड (OTP) प्रविष्ट करा. ओटीपी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावर येईल. यानंतर तुम्ही तुमचा बॅलन्स तपासू शकता. याठिकाणी तुम्ही पासबुक पाहण्याव्यतिरिक्त क्लेम देखील करू शकता. हे एक सरकारी App आहे. तुम्ही विविध सुविधांचा फायदा या अॅपमधून घेऊ शकता. हे वाचा-अदानी समूह खरेदी करणार NDTV? चर्चा सुरू होताच उसळली शेअर्सची किंमत 4. वेबसाइटच्या माध्यमातून तपासा पीएफमधील शिल्लक याकरता तुम्हाला Epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ई-पासबुकवर क्लिक करावं लागेल. त्यावेळी तुम्ही passbook.epfindia.gov.in या नवीन पेजवर याल. याठिकाणी युजर नेम, तुमचा UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करून ई-पासबुकवर क्लिक करा. याठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी मेंबर आयडीवर क्लिक करा आणि अशाप्रकारे तुम्ही खात्याचील रक्कम वेबसाइटच्या माध्यमातून तपासू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: