जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: आज पुन्हा सोने दरात घसरण, 2 आठवड्यात 1200 रुपये स्वस्त झालं सोनं

Gold Price Today: आज पुन्हा सोने दरात घसरण, 2 आठवड्यात 1200 रुपये स्वस्त झालं सोनं

Gold Price Today: आज पुन्हा सोने दरात घसरण, 2 आठवड्यात 1200 रुपये स्वस्त झालं सोनं

कमकुवत जागतिक संकेतांमुळे सोने-चांदी दरात घसरण होत असल्याचं बोललं जात आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज MCX वर आज सोने दर 0.16 टक्क्यांनी घसरला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : भारतीय बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात घसरण (Gold price today) पाहायला मिळाली. तर चांदीच्या दरात (Silver price today) काहीशी तेजी पाहायला मिळाली. कमकुवत जागतिक संकेतांमुळे सोने-चांदी दरात घसरण होत असल्याचं बोललं जात आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज MCX वर आज सोने दर 0.16 टक्क्यांनी घसरला आहे. सोने-चांदी दर (Gold-Silver Price) - MCX वर आज सोनं 0.16 टक्क्यांच्या घसरणीसह 46,205 रुपये प्रति 10 ग्रॅम स्तरावर आहे. तर चांदी 0.1 टक्के वाढीसह 59,615 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. 24 कॅरेट गोल्ड रेट - गुडरिटर्न वेबसाईटनुसार, देशातील सर्व शहरांत 24 कॅरेट सोन्याचा भाव वेगवेगळा आहे. 21 सप्टेंबर रोजी देशाची राजधानी दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 49,570 रुपये आहे. तर मुंबईत 46,120 रुपये, चेन्नईमध्ये 47,550 आणि कोलकातामध्ये 48,240 रुपये आहे. 22 कॅरेट गोल्ड रेट - 22 कॅरेट गोल्ड रेट गुडरिटर्न वेबसाईटनुसार, दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 45,440 रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईमध्ये 43,590 रुपये, मुंबईत 45,120 रुपये आणि कोलकातामध्ये 45,540 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा दर सर्वोच्च 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला होता. त्याआधारे आता सोनं सर्वोच्च स्तराच्या तुलनेत 10000 रुपये प्रति 10 ग्रॅम होतं.

खूशखबर! PF ची रक्कम 3 दिवसांऐवजी केवळ एका तासात जमा होणार, जाणून घ्या प्रक्रिया

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या सेमेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. ‘BIS Care app’ असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात