जाहिरात
मराठी बातम्या / मनी / अदानी समूह खरेदी करणार NDTV? चर्चा सुरू होताच 10 टक्क्यांनी उसळली शेअर्सची किंमत

अदानी समूह खरेदी करणार NDTV? चर्चा सुरू होताच 10 टक्क्यांनी उसळली शेअर्सची किंमत

अदानी समूह खरेदी करणार NDTV? चर्चा सुरू होताच 10 टक्क्यांनी उसळली शेअर्सची किंमत

सोमवारी अदानी ग्रुप दिल्ली स्थित एनडीटीव्ही ही मीडिया कंपनी (NDTV) खरेदी करणार असल्याची बातमी ईटी मार्केटसमध्ये झळकल्यानं एनडीटीव्हीच्या शेअर्सने (NDTV Share) जबरदस्त उसळी घेतली.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली 21 सप्टेंबर : देशातील एक आघाडीचा उद्योग समूह असलेला अदानी समूह (Adani Group) आता मीडिया क्षेत्रात (Media Sector) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सध्या ऊत आला आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी अदानी ग्रुप दिल्ली स्थित एनडीटीव्ही ही मीडिया कंपनी (NDTV) खरेदी करणार असल्याची बातमी ईटी मार्केटसमध्ये झळकल्यानं एनडीटीव्हीच्या शेअर्सने (NDTV Share) जबरदस्त उसळी घेतली. त्यामुळे या शेअरला सोमवारी 10 टक्क्यांचं अप्पर सर्किट (Upper Circuit) लागलं. ईटीने या बातमीची पडताळणी केलेली नसल्याचे स्पष्ट केलं आहे तरीही अदानी समूह एनडीटीव्ही खरेदी करणार असल्याच्या अफवेने शेअर बाजारात एनडीटीव्हीच्या शेअर्सना मागणी प्रचंड वाढली. मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईवर (BSE) एनडीटीव्हीच्या शेअरच्या किंमतीत 9.94 टक्के वाढ होऊन तो 79.65 रुपयांवर पोहोचला होता. खूशखबर! PF ची रक्कम 3 दिवसांऐवजी केवळ एका तासात जमा होणार, जाणून घ्या प्रक्रिया अलीकडेच अदानी समूहानं (Adani Group) आपल्या समूहाच्या माध्यमातील कामकाजासाठी वरिष्ठ पत्रकार संजय पुगलिया (Sanjay Pugalia) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि मुख्य संपादक (Chief Editor) म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे अदानी समूह मीडिया क्षेत्रात प्रवेश करणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. संजय पुगलिया यापूर्वी क्विंट डिजिटल मीडियाचे अध्यक्ष आणि संपादकीय संचालक होते. यापूर्वी त्यांनी सीएनबीसी-आवाजचे नेतृत्व केले असून, हिंदीत स्टार न्यूजची स्थापना केली आहे. झी न्यूजचेही ते प्रमुख होते. आज तकच्या संस्थापक गटातही त्यांचा सहभाग होता. बिझनेस स्टँडर्ड आणि नवभारत टाइम्समध्ये पत्रकार म्हणूनही काम केले आहे. बीबीसी हिंदी रेडिओसाठीही त्यांचे मोलाचे योगदान आहे. इतक्या वरिष्ठ, अनुभवी व्यक्तीची नियुक्ती केल्यानं अदानी समूह लवकरच मीडिया क्षेत्रात प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. या समूहानं मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. ‘या’ सरकारी पोर्टलवर करा नोंदणी, होईल बराच फायदा; वाचा सविस्तर दरम्यान, एनडीटीव्हीची आर्थिक स्थिती चांगली नाही. कंपनीचे प्रवर्तक (Promoters) कर चुकवेगिरीच्या प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. गेल्या एका वर्षात मात्र कंपनीच्या शेअरमध्ये 130 टक्क्यांची वाढ झाली आहे. आता अदानी समूह खरेदी करणार असलेले मीडिया हाऊस म्हणजे एनडीटीव्ही असल्याच्या चर्चेने या शेअरमध्ये आणखी वाढ झाली आहे. अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी एंटरप्रायजेस, अदानी पोर्ट्स (एपीएसईझेड) आणि अदानी पॉवर अशा अनेक कंपन्या असलेल्या अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) 67.1 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे मालक असून, आशियातील पहिल्या पाच श्रीमंतांमध्ये त्यांचा समावेश आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात