• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Post Office Scheme: 1500रुपये करा जमा मिळतील 35लाख रुपये; जाणून घ्या कसं

Post Office Scheme: 1500रुपये करा जमा मिळतील 35लाख रुपये; जाणून घ्या कसं

ही पॉलिसी खरेदी केल्यानंतर चार वर्षांनंतर या पॉलिसीवर कर्जही (Loan on Policy) घेता येऊ शकतं.

  • Share this:
 मुंबई, 21 सप्टेंबर- गुंतवणुकीचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. त्यातल्या अनेक पर्यायांमध्ये आकर्षक परताव्याचा दावाही केलेला असतो; मात्र त्यांपैकी अनेक पर्याय जोखीमयुक्त असतात, शेअर बाजारावर आधारित असतात. जोखीम कमी (Less Risk) असलेल्या अनेक पर्यायांमधून मिळणारा परतावा तुलनेने कमी असतो; मात्र तो निश्चित परतावा असतो. त्यामुळे अनेक जण अशा कमी जोखमीच्या पर्यायात गुंतवणुकीला (Risk Free Investment) प्राधान्य देतात. तुम्हीही असाच काही पर्याय शोधत असाल, तर पोस्ट खात्यातल्या (Post Office) गुंतवणुकीचा हा पर्याय तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. ग्राम सुरक्षा योजना (Gram Suraksha Scheme) असं त्या योजनेचं नाव असून, त्यात तुम्ही कमी जोखीम पत्करून चांगला परतावा मिळवू शकता. या योजनेअंतर्गत आधीच निश्चित झालेल्या रकमेसह बोनसही (Bonus) योजनेच्या अखेरीस मिळतो. संबंधित व्यक्ती 80 वर्षांची झाल्यानंतर त्या व्यक्तीला किंवा त्याआधीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या वारसाला ही रक्कम मिळते. (हे वाचा:6.5 कोटी नोकरदारांना दिवाळीआधी मिळणार Good News! PF खात्यात येणार व्याजाचे पैसे) 19 ते 55 वर्षं वयाची कोणीही भारतीय व्यक्ती या विमा योजनेचा (Insurance Scheme) लाभ घेऊ शकते. या योजनेत कमीत कमी 10 हजार रुपयांपासून जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा उतरवता येतो. या योजनेचा हप्ता मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक अशा अंतराने भरता येतो. हप्त्याच्या (Premium) ठरलेल्या तारखेनंतर 30 दिवसांपर्यंत ग्राहकाला हप्ता भरण्यासाठी सवलतही दिली जाते. पॉलिसी सुरू असताना एखादा हप्ता भरायचा राहिल्यास पॉलिसी बंद पडते; मात्र तो हप्ता भरल्यानंतर पॉलिसी पुन्हा सुरू होते. ही पॉलिसी खरेदी केल्यानंतर चार वर्षांनंतर या पॉलिसीवर कर्जही (Loan on Policy) घेता येऊ शकतं. पॉलिसीला तीन वर्षं झाल्यानंतर ती सरेंडर (Surrender) करण्याचा पर्यायही उपलब्ध असतो; मात्र सरेंडर केल्यास त्याचा कोणताही लाभ मिळत नाही. पोस्ट खात्याकडून दिला जाणारा बोनस हे या योजनेचं सर्वांत मोठं आकर्षण आहे. प्रति वर्षी 65 रुपये प्रति 1000 रुपये असा अंतिम बोनस घोषित करण्यात आला आहे. (हे वाचा:LIC Special Policy: अवघ्या 2582 रुपयांच्या बचतीवर मिळवा तब्बल 1 कोटी रुपये) एखाद्या व्यक्तीने वयाच्या 19व्या वर्षी 10 लाख रुपयांची ग्राम सुरक्षा पॉलिसी खरेदी केली, तर 55 वर्षांसाठी मासिक प्रीमियम 1515 रुपये एवढा लागेल. 58 वर्षांसाठी 1463 रुपये, तर 60 वर्षांपर्यंत 1411 रुपये एवढा मासिक प्रीमियम भरावा लागेल. वयाच्या 55 व्या वर्षापर्यंतची पॉलिसी खरेदी केल्यास 31.60 लाख रुपये, 58 व्या वर्षापर्यंतची पॉलिसी खरेदी केल्यास 33.40 लाख रुपये, तर 60 व्या वर्षापर्यंतची पॉलिसी खरेदी केल्यास 34.60 लाख रुपये एवढा मॅच्युरिटी बेनिफिट (Maturity Benefit) मिळू शकेल. पॉलिसीचं नामांकन करायचं असेल, किंवा ई-मेल आयडी, मोबाइल नंबर वगैरे बाबींमध्ये अपडेट्स करायचे असले, तर त्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधता येऊ शकतो. अन्य समस्या किंवा शंकांच्या निरसनासाठी 1800 180 5232/155232 या टोल फ्री हेल्पलाइनवर संपर्क साधता येऊ शकतो. www.postallifeinsurance.gov.in या अधिकृत वेबसाइटवरही सर्व प्रकारची माहिती मिळू शकते.
First published: