नवी दिल्ली, 21 सप्टेंबर: भारतीय सराफा बाजारात आज सोन्याचे दर (Gold Price Today) 21 सप्टेंबर रोजी कमी झाले आहेत. तर चांदीच्या दरात (Silver Price Today) आज वाढ झाली आहे. आधीच्या व्यवहाराच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 45,261 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. तर चांदीचे दर 58,710 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही. सोन्याचा नवा दर दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा (Gold Rates on Tuesday) दर केवळ 3 रुपयांनी कमी झाला आहे. यानंतर 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर 45,258 रुपये प्रति तोळावर आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या किरकोळ घसरणीनंतर सोन्याचा दर 1,761 डॉलर प्रति औंस आहे. चांदीचा नवा दर चांदीच्या किंमतीत (Silver Rates on Tuesday) आज उसळी पाहायला मिळाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी चांदीच्या दरात 40 रुपयांची किरकोळ वाढ पाहायला मिळाली आहे. या वाढीनंतर चांदीचे दर 58,750 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही. ग्लोबल मार्केटमध्ये (Gold Rates on Global Market) चांदीचे दर 22.42 डॉलर प्रति औंसवर आहेत. हे वाचा- 1 ऑक्टोबरपासून या बँकांचं चेकबुक वापरून करता येणार नाही पेमेंट, वाचा सविस्तर का कमी झाले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनिअर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, फेडरल ओपन मार्केट कमिटीची दोन दिवसीय बैठक आज सुरू होणार आहे. अशावेळी गुंतवणूकदार बैठकीच्या निर्णयाची आणि फेड अधिकाऱ्यांच्या निवेदनाची वाट पाहत आहेत. आज सकाळी फॉरेक्स मार्केटमध्ये डॉलरच्या तुलनेत 15 पैशांच्या वाढीनंतर रुपया 73.59 च्या पातळीवर व्यवहार करत होता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत चढ -उतार सुरूच आहेत. यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत किंचित घट झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.