मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol-Diesel Price Today: इंधन दरवाढीने सर्वसामान्य मेटाकुटीला, आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेल भाव

Petrol-Diesel Price Today: इंधन दरवाढीने सर्वसामान्य मेटाकुटीला, आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेल भाव

 सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price Today) 35 पैशांची वाढ केली आहे. केवळ ऑक्टोबर महिन्यात इंधन दर 4.50 रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे.

    नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : पेट्रोल-डिझेलचे दर आज बुधवारी पुन्हा एकदा वाढवण्यात आले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price Today) 35 पैशांची वाढ केली आहे. केवळ ऑक्टोबर महिन्यात इंधन दर 4.50 रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे. IOCL च्या आज जारी झालेल्या रेटनुसार, दिल्लीत इंडियन ऑइल पंपवर पेट्रोल 106.19 रुपये प्रति लीटर विक्री होत आहे. तर डिझेल दर 94.92 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या दरातही मोठी तेजी आहे. ऑक्टोबरमध्ये 5 रुपयांनी वाढले इंधन दर - ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 15 वेळा इंधन दरवाढ झाली आहे. केवळ तीन दिवस सोडून दररोज पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. केवळ ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल 4.45 रुपये महागलं आहे. तर डिझेल 5 रुपयांनी वाढलं आहे. कच्च्या तेलाच्या दरात तेजी आहे, त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरवाढ कायम आहे.

    रिझर्व्ह बँकेने SBI ला ठोठावला 1 कोटींचा दंड, पाहा ग्राहकांवर काय होणार परिणाम

    चार महानगरात पेट्रोल डिझेल भाव (Petrol Diesel Price on 20 October 2021) - >> दिल्लीत पेट्रोल 106.19 रुपये आणि डिझेल 94.92 रुपये प्रति लीटर >> मुंबईत पेट्रोल 112.11 रुपये आणि डिझेल 102.89 रुपये प्रति लीटर >> चेन्नईमध्ये पेट्रोल 103.31 रुपये आणि डिझेल 99.26 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 98.03 रुपये प्रति लीटर देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel price, Petrol and diesel prices continued to rise, Petrol Diesel hike, Petrol price hike

    पुढील बातम्या