• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Gold-Silver Price Today: आजही महागलं सोनंचांदी, खरेदीपूर्वी इथे वाचा प्रति तोळा सोन्याचा भाव

Gold-Silver Price Today: आजही महागलं सोनंचांदी, खरेदीपूर्वी इथे वाचा प्रति तोळा सोन्याचा भाव

Gold-Silver Price Today: या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत झालेल्या घसरणीनंतर आज सोन्याचे दर वधारले आहेत. जाणून घ्या काय आहे प्रति तोळाचा भाव

  • Share this:
    नवी दिल्ली, 27 ऑगस्ट: सोनं आणि चांदीच्या किंमतीत (Gold-Silver Price Today) सातत्याने झालेल्या घसरणीनंतर या आठवड्यात आज सोन्याचे दर वधारले आहेत. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX Multi Commodity Exchange) आज सोन्याच्या दरासह चांदी देखील वधारली आहे. एमसीएक्सवर आज सोन्याच्या दरात  0.38 टक्के वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 0.24 टक्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. घरबसल्या जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही  www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता हे वाचा-सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; अद्यापही अनेक शहरात पेट्रोल शंभरीपार सोन्याचांदीचे दर (Gold-Silver Price today, 27 August) सोन्याच्या दरात आज 0.38 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर दर 47,415 प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर चांदीमध्ये 0.24 टक्क्यांच्या वाढीनंतर दर 62,874 प्रति किलोवर पोहोचले आहेत. सोन्याचे दर गाठणार 50000 चा टप्पा तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे दर लवकरच 50000 रुपये प्रति तोळावर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे. सध्या दर तुलनेने कमी असल्याने गुंतवणूकदार यात गुंतवणूक करू शकतात. आधीपासून सोन्यात गुंतवणूक करत असाल तर आता देखील होल्ड ठेवणं फायदेशीर ठरू शकेल. अशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता? जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. हे वाचा-EPFO: PF सह कपात होणाऱ्या पेन्शनचे पैसे कधी मिळतील? जाणून घ्या नियम या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: