• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • EPFO: PF सह कपात होणाऱ्या पेन्शनचे पैसे कधी मिळतील? जाणून घ्या नियम

EPFO: PF सह कपात होणाऱ्या पेन्शनचे पैसे कधी मिळतील? जाणून घ्या नियम

EPS- Employee Pension Scheme

EPS- Employee Pension Scheme

नोकरदार वर्गामध्ये त्यांच्या पीएफविषयी (PF Account) नेहमी चिंता असते. यामध्ये जमा होणारे पैसे योग्य वेळी मिळणार की नाही याबाबत त्यांना विविध प्रश्न देखील असतात. दरम्यान अनेक कर्मचारी असे असतात की यामध्ये मिळणाऱ्या पेन्शनबाबत त्यांना कल्पना नसते. जाणून घ्या EPS विषयी...

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 ऑगस्ट: नोकरदार वर्गामध्ये त्यांच्या पीएफविषयी (PF Account) नेहमी चिंता असते. यामध्ये जमा होणारे पैसे योग्य वेळी मिळणार की नाही याबाबत त्यांना विविध प्रश्न देखील असतात. दरम्यान अनेक कर्मचारी असे असतात की यामध्ये मिळणाऱ्या पेन्शनबाबत त्यांना कल्पना नसते. तुमच्या पगारातून कापली जाणारी रक्कम दोन खातात जाते. यातील एक हिस्सा ईपीएफ आणि दुसरा हिस्सा पेन्शन फंडमध्ये जातो. कर्मचाऱ्याच्या पगारातून कापली जाणारी 12 टक्के रक्कम ईपीएफ खात्यात जमा होते. याशिवाय कंपनीकडून योगदान होणाऱ्या 12 टक्के रकमेपैकी 3.67 टक्के भाग पीएफमध्ये तर उर्वरित 8.33 टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) जमा होतात. कधी काढता येतील पैसे? तुमच्या पीएफ खात्यातील पैसे कोणत्याही कर्मचाऱ्याला एका निश्चित कालावधीनंतर काढता येतात. मात्र पेन्शन रक्कम काढण्याचे नियम कठोर आहेत, ते वेगवेगळ्या स्थितीत निश्चित होतात. जर नोकरी 6 महिन्यापेक्षा जास्त आणि 9 वर्ष 6 महिन्यापेक्षा कमी आहे तर फॉर्म 19 आणि 10C जमा करून पीएफ रकमेसह पेन्शनची रक्कम देखील काढता येते.  जर तुमची नोकरी  9 वर्ष 6 महिन्यापेक्षा जास्त आहे तर तुम्ही पीएफसह पेन्शनची रक्कम काढू शकत नाही. कारण एवढ्या वर्षांची सेवा 10 वर्षांची सेवा मानली जाते. हे वाचा-ग्रामीण भागातील युवकांसाठी मोठी संधी; या योजनेतून सुरु करु शकता व्यवसाय EPFO चा नियम असा आहे की जर तुम्ही नोकरी 10 वर्ष केली असेल तर तुम्ही पेन्शनसाठी पात्र असता. अर्थात यानंतर आता तुम्हाला वयाच्या 58व्या वर्षानंतर मासिक पेन्शनचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. ही पेन्शन तुम्हाला आजीवन मिळत राहील. मात्र निवृत्तीपूर्वी तुम्ही या निवृत्तीवेतनाचा हिस्सा काढू शकत नाही. तुमची नोकरीची वर्ष  9 वर्ष 6 महिन्यापेक्षा कमी असण्याच्या स्थितीमध्ये जर तुम्ही पेन्शनची रक्कम काढली तर तुम्ही यानंतर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही. पीएफसह पेन्शनचे पैसे काढण्याचा अर्थ Full & Final PF settlement असा होतो. या परिस्थितीत तुमचे ते पीएफ खाते पूर्णपणे बंद केले जाते. हे वाचा-केवळ 50 रुपये दररोज वाचवून व्हाल करोडपती, जाणून घ्या काय आहे ही सोपी प्रोसेस पीएफ ट्रान्सफर करताना पेन्शनच्या रकमेचं काय होणार? जर तुम्ही प्रोव्हिडेंट फंडमधील पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले तर कितीही सर्व्हिस हिस्ट्री असून तुम्हीन पेन्शनची रक्कम काढू शकणार नाही. अर्थात वेगवेगळ्या नोकऱ्या करून देखील तुमची सर्व्हिस हिस्ट्री 10 वर्ष झाली तर तुम्ही पेन्शनसाठी पात्र व्हाल आणि वयाच्या 58 व्या वर्षानंतर तुम्हाला मासिक पेन्शन मिळेल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: