Gold Silver Rates: 4 दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा वधारले सोन्याचे भाव, वायदे बाजारात पडझड कायम

Gold Silver Rates: 4 दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा वधारले सोन्याचे भाव, वायदे बाजारात पडझड कायम

Gold-Silver Rate: चार दिवसांच्या घसरणीनंतर शुक्रवारी सोन्याचे दर वाढले आहेत. वायदे बाजारात पाचव्या दिवशीही घसरण कायम होती

  • Share this:

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर: सलग 4 दिवस सोन्याचे भाव घसरत होते. मात्र शुक्रवारी बाजार बंद होत असताना सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीतील सराफा बाजारात स्पॉट गोल्ड (Spot Gold) मध्ये किरकोळ वाढ झाली आहे. याआधी गुरुवार पर्यंतच्या सत्रात सोनं स्वस्त झालं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यामध्ये तेजी आल्यामुळे देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर (Gold Price Today) असा परिणाम पाहायला मिळाला आहे. दरम्यान वायदे बाजारात शुक्रवारी सलग पाचव्या दिवशी देखील सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली.

सोन्याचे नवे दर

शुक्रवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Price, 19 November 2020) 65 रुपये प्रति तोळाने वधारले आहेत. या वाढीनंतर सोनं  49,551 रुपये प्रति तोळावर पोहोचलं आहे. आधीच्या सत्रात सोन्याचे दर 49,486 रुपये प्रति तोळा होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढून  1,868 डॉलर प्रति औंस झाले आहेत.

(हे वाचा-चुटकीसरशी बुक करा LPG गॅस सिलेंडर, 50 लाख ग्राहक वापरतात ही पद्धत)

चांदीचे नवे दर

सोन्याबरोबर आज चांदीच्या दरामध्ये देखील (Silver Price, 19 November 2020) तेजी पाहायला मिळाली. प्रति किलो चांदीमध्ये 298 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर चांदीचे भाव  61,232 रुपये प्रति किलो झाले आहेत. आधीच्या सत्रात चांदीचे भाव 60,934 रुपये प्रति किलो होते. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर वाढून 24.15 डॉलर झाले आहेत.

वायदे बाजारात घसरण

शुक्रवारी मल्टी कमोडिटी  एक्सचेंज (MCX- Multi-Commodity Exchange) वर सोन्याचे दर 0.11 टक्क्याने कमी होऊन 50,029 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत होते. दरम्यान आज चांदीचे दर काहीसे वधारले आहे. 0.3 टक्क्यांनी चांदी महागल्याने एमसीएक्सवर दर 61,690 रुपये प्रति किलोग्रॅमवर होते. याआधीच्या सत्रात सोन्याचे दर 0.7 टक्के अर्थात 350 रुपये प्रति तोळाने घसरले होते, तर चांदी 1.63 टक्के अर्थात 1000 रुपये प्रति किलोने कमी झाली होती.

(हे वाचा-भारतीय रेल्वेबरोबर सुरू करा हा व्यवसाय, दर महिन्याला होईल लाखोंची कमाई)

दरम्यान कोव्हिड-19 संक्रमणाचा परिणाम देखील सोन्याच्या बाजारावर होताना दिसत आहे. कोरोना लशीच्या प्रगतीसंदर्भात बातम्या समोर येत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये आशा वाढली आहे. याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इक्विटी मार्केट देखील सर्वोच्च स्तरावर आहेत. मात्र कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता जोखीम देखील वाढली आहे. अमेरिकेत प्रोत्साहन पॅकेजबाबत अनिश्चितता कायम आहे. अमेरिकेचे ट्रेजरी सेक्रेटरी स्टीव्हन म्युचिन यांनी म्हटले आहे की, लॉमेकर्सवर खर्च न केलेला प्रोत्साहन निधी पुनर्निर्देशित केला गेला पाहिजे.

गोल्ड ईटीएफमध्ये देखील कमी गुंतवणूक

गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये (Gold ETF) गुंतवणूकदारांनीही कमी रस दाखवला आहे. एसपीडीआर गोल्ड ट्रस्टमध्ये गोल्ड ईटीएफ होल्डिंग 0.14 टक्क्यांनी वाढून 1,217.25 टन झाली. हे जगातील सर्वात मोठे गोल्ड ईटीएफ आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 21, 2020, 8:54 AM IST

ताज्या बातम्या