Home /News /money /

चुटकीसरशी बुक करा LPG गॅस सिलेंडर, 50 लाख ग्राहक वापरतात ही पद्धत

चुटकीसरशी बुक करा LPG गॅस सिलेंडर, 50 लाख ग्राहक वापरतात ही पद्धत

LPG गॅसचे ऑनलाइन (LPG Cylinder Booking)बुकिंग करण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. दरम्यान पेटीएमच्या माध्यमातून सिलेंडर बुक केल्यास ग्राहकांना कॅशबॅक देखील मिळतो.

    नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर: एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंगसाठी (LPG Cylinder Booking) गेल्या काही काळापासून जास्त प्रमाणात पेटीएम (Paytm)चा वापर केला जात आहे. या डिजिटल फायनान्शिअल सर्व्हिस प्लॅटफॉर्मने शुक्रवारी अशी माहिती दिली की एलपीजी बुकिंग सुविधा लाँच केल्यानंतर एका वर्षामध्ये 50 लाखांपेक्षा जास्त बुकिंग्ज झाले आहेत. यानंतर आता एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंगसाठी पेटीएम आता देशातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म बनला आहे. गेल्या वर्षीच पेटीएमने ‘Book a Cylinder’ ही सेवा लाँच केली होती. कंपनीने याकरता सुरुवातीला HP आणि त्यानंतर इंडियन ऑइल आणि इंडेनबरोबर पार्टनरशीप केली होती. यावर्षी मे महिन्यात पेटीएमने भारत गॅसशी देखील टायअप करण्याची घोषणा केली होती. या प्लॅटफॉर्मवर एलपीजी गॅस बुक करण्याची प्रक्रिया अत्यंत सहज आणि सोपी असल्यामुळे अनेक ग्राहकांनी यास पसंती दिली. पेटीएमवर कशाप्रकारे बुक कराल LPG? -या अ‍ॅपच्या माध्यमातून एलपीजी गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी ‘Book a Cylinder’ या टॅबवर क्लिक करा. -याठिकाणी तुम्हाला गॅस सर्व्हिस प्रोव्हायडर, LPG ID/मोबाइल नंबर/कंझ्यूमर नंबर टाकावा लागेल. (हे वाचा-भारतीय रेल्वेबरोबर सुरू करा हा व्यवसाय, दर महिन्याला होईल लाखोंची कमाई) -यानंतर पेमेंटचा पर्याय सिलेक्ट करून सिलेंडर बुक करता येईल -यानंतर तुमच्या जवळची गॅस एजन्सी घरापर्यंत गॅस सिलेंडर डिलिव्हर करेल. पेटीएमचे उपाध्यक्ष नरेंद्र यादव यांनी असे म्हटले आहे की, 'एलपीजी सिलेंडर देशातील सर्वात मोठ्या युटिलिटी कॅटेगरीपैकी आहे. यामध्ये सर्व सामाजिक आणि आर्थिक वर्ग तसंच भौगोलिक क्षेत्रातील लोकं येतात. डिजिटलकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी 1 कोटी बुकिंगची संख्या गाठण्याचा दिशेने काम करत आहोत.'
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gas

    पुढील बातम्या