Home /News /money /

EPFO: PF Account चे हे 6 फायदे तुम्हाला माहित आहेत का? सहज मिळवता येईल लाभ

EPFO: PF Account चे हे 6 फायदे तुम्हाला माहित आहेत का? सहज मिळवता येईल लाभ

PF Account 6 Important Benefits: पीएफ अकाउंटच्या अनेक फायद्यांबाबत EPFO सदस्यांना माहितच नाही आहे. याठिकाणी आपण PF खात्याच्या विविध फायद्यांविषयी जाणून घेऊया..

    मुंबई, 21 ऑक्टोबर: PF खात्यातील पैसे प्रत्येक नोकरदार वर्गासाठी भविष्यासाठीची तरतूद असते. यामध्ये तुमच्या पगारातील ठराविक रक्कम दरमहा जमा होत असते. भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून नोकरदार वर्गाला पीएफची (PF benefits) सुविधा दिली जाते. यामुळे रिटायरमेंटनंतरचे तुमचे आयुष्य सुखकर होण्यास मदत होते. नोकरदार व्यक्तीचे पीएफ खाते असे खाते आहे ज्यात ती व्यक्ती स्वतः आणि तिचा नियोक्ता विशिष्ट रक्कम जमा करतो. हे EPFO खाते नियोक्त्याद्वारे सुरू केले जाते. यामध्ये, तुमचा नियोक्ता तुमच्या पगारातून (सध्या 12 टक्के) ठराविक रक्कम कापून पीएफ खात्यात जमा करतो. शिवाय नियोक्त्याकडूनही काही रक्कम जमा केली जाते. ही रक्कम सरकारद्वारे निश्चित केली जाते. दरम्यान पीएफ अकाउंटच्या अनेक फायद्यांबाबत EPFO सदस्यांना माहितच नाही आहे. याठिकाणी आपण PF खात्याच्या विविध फायद्यांविषयी जाणून घेऊया.. 1. मोफत विम्याची सुविधा उपलब्ध कर्मचाऱ्याचे पीएफ खाते उघडताच तो विमाधारकही होतो. एम्प्लॉयी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (IDLI scheme) अंतर्गत, कर्मचाऱ्याचा 6 लाख रुपयांपर्यंतचा विमा आहे. ईपीएफओच्या सक्रिय सदस्याचा सेवेच्या कालावधीत मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनीला किंवा कायदेशीर वारसाला 6 लाख रुपयांपर्यंत पैसे दिले जातात. कंपन्या आणि केंद्र सरकार त्यांच्या कर्मचाऱ्यांना हा लाभ देतात. वाचा-भारतात पुन्हा येणार High Paid Salary चे दिवस! होणार सरासरी 9.3% पगारवाढ 2. कर सूट तुम्हाला करात सूट हवी असली तरी, पीएफ हा सर्वोत्तम पर्याय आहे. दरम्यान तुम्हाला हे देखील माहित असले पाहिजे की नवीन कर प्रणालीमध्ये अशी सुविधा नाही, तर जुन्या कर प्रणालीमध्ये कर सूट उपलब्ध आहे. ईपीएफ खातेधारक आयकर कलम 80 सी अंतर्गत त्यांच्या पगारावर 12 टक्के कर वाचवू शकतात. 3. निवृत्तीनंतर पेन्शन जर तुम्ही 10 वर्षे सतत पीएफ खाते चालू ठेवले तर तुम्हाला आजीवन कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ मिळेल. म्हणजेच, अशा नोकरीत (नोकऱ्यांमध्ये) सतत 10 वर्षे राहणे जिथून तुमच्या पीएफ खात्यात पैसे जमा होत राहतील तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. तुम्हाला कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत सेवानिवृत्तीनंतर एक हजार रुपये पेन्शन मिळत राहील. 4. निष्क्रिय खात्यावर व्याज कर्मचाऱ्यांच्या निष्क्रिय पीएफ खात्यावरही व्याज दिले जाते. 2016 मध्ये कायद्यात केलेल्या बदलांनुसार, आता पीएफ खातेधारकांना त्यांच्या वर्षांहून अधिक काळ निष्क्रिय असणाऱ्या पीएफ खात्यात जमा रकमेवर देखील व्याज दिले जाते. यापूर्वी तीन वर्षे निष्क्रिय पडलेल्या पीएफ खात्यावर व्याज देण्याची तरतूद नव्हती. वाचा-मोठी बातमी! Facebook वर 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड, वाचा काय आहे कारण 5. ऑटो ट्रान्सफर सुविधा तुम्ही आधारशी जोडलेल्या तुमच्या यूएएन क्रमांकाद्वारे एकापेक्षा जास्त पीएफ खाते (जर तुम्ही नोकरी बदलत असाल) लिंक करू शकता. नोकरी बदलल्यावर पीएफचे पैसे ट्रान्सफर करणे आता सोपे झाले आहे. नवीन नोकरी जॉइन केल्यानंतर ईपीएफ पैशासाठी क्लेम करणारा स्वतंत्र फॉर्म -13 भरण्याची गरज नाही. आता ते आपोआप होईल. EPFO ने एक नवीन फॉर्म, फॉर्म 11 सादर केला आहे जो फॉर्म 13 च्या जागी वापरला जाईल. ही प्रक्रिया ऑटो ट्रान्सफरच्या सर्व केसमध्ये वापरले जाईल. 6. गरजेच्या वेळी पैसे काढता येतात पीएफ फंडाचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे गरजेच्या वेळी काही पैसेही त्यातून काढता येतात. हे तुम्हाला कर्जाच्या ओझ्यापासून वाचवेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Epfo news, Pf, PF Amount, Pf news

    पुढील बातम्या