नवी दिल्ली, 07 जानेवारी: पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाले आले. सलग 29 दिवस इंधनाचे दर स्थीर होते. दरम्यान त्यामध्ये बुधवारपासून वाढ होऊ लागली आहे. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये गुरुवारी पेट्रोलचे दर 23 पैशांनी वाढून 84.20 रुपये प्रति लीटर झाले आहेत तर डिझेलचे दर 26 पैसे प्रति लीटरने वाढून 74.38 रुपये झाले आहेत. सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल-डिझेलच्या किंमती रिव्हाइज करतात. 8 डिसेंबरपासून इंधनाच्या किंमतीत कोणतेही बदल झाले नव्हते. मात्र वर्षाच्या पहिल्या महिन्यात बुधवारी आणि गुरुवारी असे सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेल महागलं आहे. रोजच्या जीवनातील अनेक गोष्टींवर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा परिणाम होतो. त्यामुळे इंधनवाढीवर सर्वांची नजर असते. जाणून घ्या काय आहेत आजचे दर अशाप्रकारे तपासता येतील पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. तुमच्या शहरात काय आहेत किंमती? दिल्ली- पेट्रोल 84.20 रुपये आणि 74.38 रुपये लीटर मुंबई- पेट्रोलचे दर 90.83 रुपये आणि डिझल 81.07 रुपये लीटर कोलकाता- पेट्रोल 85.68 रुपये आणि डिझल 77.97 रुपये लीटर चेन्नई- पेट्रोल 86.96 रुपये आणि डिझलचे दर 79.72 रुपये लीटर बेंगळुरु- पेट्रोल 87.04 रुपये आणि डिझेल 78.87 रुपये लीटर नोएडा- पेट्रोल 84.06 रुपये आणि डिझेल 74.82 रुपये लीटर गुरुग्राम- पेट्रोल 82.39 रुपये आणि डिझेल 74.97 रुपये प्रति लीटर लखनऊ- पेट्रोल 83.98 रुपये आणि डिझेल 74.74 रुपये प्रति लीटर पाटणा- पेट्रोल 86.75 रुपये आणि डिझेल 79.51 रुपये प्रति लीटर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ पाहायला मिळते आहे. लंडनमध्ये ब्रेंट क्रूडचा दर 53.89 डॉलर प्रति बॅरल झाला आहे. तर अमेरिकी WTI क्रूडचा दर प्रति बॅरल 50 डॉलर पेक्षाही जास्त आहे. देशांतर्गत बाजाराबाबत बोलायचे झाल्यास गेल्यावर्षी दुसऱ्या सहामाहीमध्ये पेट्रोलच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यावेळी ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये किंमती वाढण्यास सुरुवात झाली होती, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तेजी कायम होती. यानंतर बऱ्याच काळासाठी पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी जास्त होत होत्या. मात्र 8 डिसेंबरपासून भाव स्थीर होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.