Home /News /money /

ग्राहकांना या बँकांकडून मोठं गिफ्ट! FD सोबत तुम्हाला मिळेल हेल्थ कव्हर

ग्राहकांना या बँकांकडून मोठं गिफ्ट! FD सोबत तुम्हाला मिळेल हेल्थ कव्हर

बँकांनी त्यांच्याकडे एफडी करणाऱ्या ग्राहकांना अनेक ऑफर्स देण्यास सुरुवात केली आहे. DCB Bank आणि ICICI बँकेमध्ये एफडी काढणाऱ्या ग्राहकांना हेल्थ इन्शूरन्स कव्हर देखील मिळणार आहे.

    नवी दिल्ली, 07 जानेवारी: सध्या देशातील सरकारी बँका आणि खाजगी बँकांमध्ये एफडीवर (Fixed Deposit) कमी व्याज मिळते आहे. दरम्यान या काळात काही बँकांनी त्यांच्याकडे एफडी काढणाऱ्या ग्राहकांसाठी काही नवीन सुविधा सुरू केल्या आहे. यामध्ये एक महत्त्वाची  सुविधा आहे हेल्थ इन्शूरन्स. सध्या डीसीबी बँक (DCB Bank) आणि आयसीआयसीआय (ICICI Bank) बँक या दोन बँकांमध्ये एफडी काढणाऱ्या ग्राहकांना हेल्थ इन्शूरन्सची सुविधा देत आहे. जाणून घ्या सविस्तर ज्या बँका त्यांच्या  ग्राहकांना एफडीवर हेल्थ इन्शूरन्सची सुविधा देतात, त्या इन्शूरन्स देणाऱ्या कंपनीबरोबर टाय-अप करतात. प्रत्येक बँकेकडून देण्यात येणाऱ्या हेल्थ इन्शूरन्समध्ये फरक असतो. डीसीबी बँकेने त्यांच्य ग्राहकांना हेल्थ इन्शूरन्स देण्यासाठी ICICI Lombard बरोबर टायअप केलं आहे. याचप्रकारे आयसीआयसीआय बँक देखील त्यांच्या ग्राहकांना एफडी काढल्यानंतर हेल्थ इन्शूरन्सची सुविधा देते आहे. (हे वाचा-Petrol Diesel Price: कोलमडतंय सामान्यांचं बजेट, सलग दुसऱ्या दिवशी इंधनाच्या दरात) निश्चित व्याजदरांवर हेल्थ इन्शूरन्स डीसीबी बँक (DCB Bank) आणि आयसीआयसीआय (ICICI Bank) बँकेकडून जारी व्याजदरांवर ग्राहकांना हेल्थ इन्शूरन्स दिला जातो. दोन्ही बँकांनी याकरता वेगवेगळी मर्यादा निश्चित केली आहे. डीसीबी बँकेकडून 700 दिवसांसाठी हेल्थ इन्शूरन्स दिला जातो. तर आयसीआयसीआय बँकेकडून 2 वर्षांसाठी हेल्थ इन्शूरन्सची सुविधा दिली जाते आहे. या रकमेवर मिळेल हेल्थ इन्शूरन्स डीसीबी बँकेकडून देण्यात येणाऱ्या एफडीवरील हेल्थ इन्शूरन्समध्ये कमीतकमी 10 हजारांची एफडी काढणे आवश्यक आहे. आयसीआयसीआय बँकेमध्ये 2 ते 3 लाख रुपयांच्या एफडीवर इन्शूरन्सची सुविधा देण्यात येत आहे. (हे वाचा-पेट्रोलच्या विक्रमी भाववाढीसाठी सज्ज व्हा! कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ...) या आरोग्य विम्यात मर्यादित कव्हर आहे बँकांकडून एफडीवर मिळालेल्या आरोग्य विम्यावर मर्यादित कव्हर आहे. उदाहरणार्थ, गंभीर आजाराच्या उपचारांसाठी आयसीआयसीआय बँक कमाल 1 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा देते आहे. त्याच वेळी या पॉलिसीमध्ये वयाची मर्यादा आहे. डीसीबी बँकेच्या हेल्थ प्लस पॉलिसीसाठी, वय 50 आणि 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरोग्य विमा घेताना या गोष्टी लक्षात ठेवा जर अशा पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही एफडी केली असेल तर तुम्ही सर्व नियम आणि अटी अतिशय बारकाईने वाचून घ्याव्यात. कारण बर्‍याच वेळा बँकांकडून 2 वर्षांच्या एफडीवर आरोग्य विमा केवळ 1 वर्षासाठी दिला जातो. याशिवाय एफडी रकमेवर जास्तीत जास्त आणि किमान रकमेवर आरोग्य विमा संरक्षणाची रक्कमही बँकांनी निश्चित केली आहे. म्हणूनच, आपण सर्व महत्त्वपूर्ण सूचना योग्यरित्या वाचल्या पाहिजेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Insurance, Money, Personal finance

    पुढील बातम्या