मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Price Today: सोनेखरेदीची योग्य संधी! आतापर्यंत 9000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, इथे तपासा आजचा भाव

Gold Price Today: सोनेखरेदीची योग्य संधी! आतापर्यंत 9000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, इथे तपासा आजचा भाव

Gold Silver Price, 29 April 2021: हो तुम्ही सोनेखरेदीचा विचार करत असाल तर सध्या तुमच्यासाठी चांगली संधी आहे. ऑगस्ट महिन्यापासून सोन्याच्या दरात 9000 रुपयांनी घसरण झाली आहे.

Gold Silver Price, 29 April 2021: हो तुम्ही सोनेखरेदीचा विचार करत असाल तर सध्या तुमच्यासाठी चांगली संधी आहे. ऑगस्ट महिन्यापासून सोन्याच्या दरात 9000 रुपयांनी घसरण झाली आहे.

Gold Silver Price, 29 April 2021: हो तुम्ही सोनेखरेदीचा विचार करत असाल तर सध्या तुमच्यासाठी चांगली संधी आहे. ऑगस्ट महिन्यापासून सोन्याच्या दरात 9000 रुपयांनी घसरण झाली आहे.

नवी दिल्ली, 29 दिल्ली: सोन्याचांदीची खरेदी (Gold and Silver Price) करण्यासाठी सध्याचा कालावधी चांगला असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. देशांतर्गत बाजारात सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर आज पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Price) तेजी आली आहे. एमसीएक्स (MCX) वर सोन्याचे दर 0.4% वाढून 47,265 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीचे दर 01.1 टक्क्यांनी वाढले आहेत. या वाढीनंतर चांदीची किंमत (Gold Price) 68,534 प्रति किलोग्राम झाले आहेत. याआधीच्या सत्रात सोन्याचे दर 0.42% घसरण झाली होती. तर चांदीचे दर 0.42% ची घसरण झाली आहे.

ऑगस्ट 200 मध्ये सोन्याचे दर 56200 रुपये प्रति तोळा या स्तरावर पोहोचले होते. त्यानंतर आतापर्यंत सोन्याचे दर 9000 रुपयांनी कमी झाले आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 0.2 टक्क्यांनी वाढून 1,784.94 डॉलर प्रति औंस या स्तरावर पोहोचले आहेत.

(हे वाचा-तज्ज्ञांनी केलं Alert! तातडीने लस घ्या; अन्यथा नव्या व्हेरियंटचा धोका वाढणार)

सोन्याच्या आजच्या किंमती (Gold Price Today)

दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचे भाव 0.4 टक्केने वाढून 47,265 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. गेल्या आठ महिन्यातील कमी स्तरावर सोन्याचे दर आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर प्रति तोळा 505 रुपयांनी कमी झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 0.2 टक्केने वाढून 1,784.94 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत.

चांदीच्या आजच्या किंमती (Silver Price Today)

दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. या वाढीनंतर चांदीचे दर 68,534 प्रति किलोग्रामवर पोहोचले आहेत. बुधवारी चांदीच्या दरात 828 रुपयांची घसरण झाली होती. या घसरणीनंतर दर 67,312 रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचले होते.

(हे वाचा-मुंबईत कोविड प्रतिबंधक लसीचा तुटवडा; पुढील तीन दिवस लसीकरण बंद)

एचडीएफसी सिक्‍योरिटीजचे सीनियर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी अशी माहिती दिली आहे की, आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे भाव स्थीर होते. अमेरिकी यील्‍डमध्ये मंगळवारी वाढ झाली आहे. त्याचाच परिणाम देशांतर्गत बाजारात पाहायला मिळाला.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Gold, Investment, Money, Multi exchange commodity