मुंबई, 29 एप्रिल: कोरोना प्रतिबंधक लस (Covid-19 Vaccine) घेण्यासाठी मुंबईकर लसीकरण केंद्रांवर गर्दी करत आहेत. मात्र, लसीकरण केंद्रांवर लसींचा तुटवडा (Covid19 vaccine shortage) जाणवत असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून लसीकरण केंद्रांवर लसीकरण ठप्प झाल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता मुंबईत पुढील तीन दिवस लसीकरण होणार नसल्याची (Vaccination paused in Mumbai) माहिती समोर आली आहे.
... तर लसीकरण सुरू करणार
मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढले तीन दिवस लसीकरण बंद राहील. पुढले तीन दिवस लसीचा साठा मिळणार नाही त्यामुळे आम्हाला लसीकरण करता येणार नाही. आम्ही प्रयत्न करत आहोत की आम्हाला लस उपलब्ध व्हावी. लस मिळाली तर आम्ही शॉर्ट नोटीसवर लोकांना कळवू आणि लसीकरण सुरू करु.
वाचा: रोगापेक्षा इलाज भंयकर, मुंबईत लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी आणि निराशा!
महापालिकेच्या लसीकरण केंदाचे ई संख्या वाढवणार आहोत. खाजगी कापण्याची कार्यालये, मोठ्या हौसिंग सोसायटी इथे आम्ही नवीन टप्याचे लसीकरण सुरू करणार आहोत. आपण टेस्टिंग तेव्हा वाढवले होते जेंव्हा सगळ्या गोष्टी सुरू होत्या. त्यावेळी बाजार, ट्रेन सगळं सुरू होती. आता या सगळ्या गोष्टी लॉकडाऊन मुळे कमी झाल्या आहेत. आपण पॉझिटिव्ह लोकांचे सर्व जवळचे लोक टेस्टिंग करत आहोत असंही सुरेश काकाणी यांनी सांगितलं.
वाचा: मोफत लसीकरण केले म्हणून जनतेवर कोणताही कर नाही, थोरातांची मोठी घोषणा
आमच्या टीम प्रत्यक्ष रुग्णाच्या घरी जाऊन पाहणी करते. त्यामुळे कोणाला कोणता बेड हवा आहे हे ठरवले जाते. आमच्याकडे ऑक्सिजन बेड आहेत. इतर बेड आहेत. आम्ही आयसीयू बेड वाढवत आहोत. आपल्याकडे 2800 आयसीयू बेड तयार झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus, Mumbai