मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /तज्ज्ञांनी केलं Alert! तातडीने लस घ्या; अन्यथा नव्या व्हेरियंटचा धोका वाढणार

तज्ज्ञांनी केलं Alert! तातडीने लस घ्या; अन्यथा नव्या व्हेरियंटचा धोका वाढणार

लोकांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास उशीर केला तर विषाणूला नव्या व्हेरियंटमध्ये म्युटेट (Mutation of virus) होण्याची संधी मिळेल.

लोकांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास उशीर केला तर विषाणूला नव्या व्हेरियंटमध्ये म्युटेट (Mutation of virus) होण्याची संधी मिळेल.

लोकांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास उशीर केला तर विषाणूला नव्या व्हेरियंटमध्ये म्युटेट (Mutation of virus) होण्याची संधी मिळेल.

  नवी दिल्ली, 29 एप्रिल : देशात कोरोनाच्या (Coronavirus second wave) दुसऱ्या लाटेचा कहर सुरूच आहे. काही शहरांमध्ये संसर्गाचा वेग काहीसा कमी झाला आहे, तर काही भागात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु, स्थिती नियंत्रणात आहे असं अजून देखील म्हणता येणार नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर लोकांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास उशीर केला तर विषाणूला नव्या व्हेरियंटमध्ये म्युटेट (Mutation of virus) होण्याची संधी मिळेल.

  हा अन्याय असेल

  केंद्र सरकारने देशातील 18 वर्षे वयावरील सर्वांना लस (corona Vaccine) देण्यास परवानगी दिल्यानंतर ही चिंता तज्ज्ञांना जाणवू लागली आहे. जे लोक लस घेत नाहीत, ते स्वतःवर आणि दुसऱ्या व्यक्तींवर अन्याय करीत आहेत,असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

  एक मोठी संधीही

  कोरोना विरुद्धच्या या लढाईला आरपारची लढाई समजून लढावे लागणार आहे. या महामारीला देशाबाहेर पिटाळण्याचा लस हा एकमेव मार्ग आहे. परंतु,प्रत्येक युवक आणि ज्येष्ठ नागरिक लस घेण्यात संकोच करणार नाही तोपर्यंत हे शक्य नाही.

  नव्या व्हेरियंटची शक्यता

  ग्लेनाईगल्स ग्लोबल हॉस्पिटलचे क्लस्टर सीओओ डॉ. मर्विन लियो यांच्या म्हणण्यानुसार,कोविड-19 विषाणू (Covid-19Virus)हा अनेक लोकांमध्ये आहे आणि तेथून त्याचा फैलाव होऊ शकतो.

  पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये कोरोनाचं संकट गडद! 11 मेपर्यंत परिस्थिती आणखी बिकट

  परंतु,त्याचवेळी त्याच्याकडे नवीन व्हेरियंट (Varient)विकसित करण्याची संधी देखील आहे. यातील काही व्हेरियंट लसीचा प्रभाव कमी करु शकतात.

  काम सोपे नाही

  लसीकरणाला वेग देणं हे सोपं काम नाही. नोंदणी करणाऱ्यांची संख्या पहिल्याच दिवशी 1 कोटींवर पोहोचली आहे. त्यात नोंदणीसाठी अजून 2 दिवस बाकी आहेत. सरकार आव्हान स्विकारत हे काम करीत आहे, ही बाब उल्लेखनीय म्हणता येईल.

  EXPLAINER : लसीकरणापूर्वी, लस घेताना आणि लसीकरणानंतर, काय काळजी घ्याल?

  कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरण (Vaccination)हे निर्णायक पाऊल ठरणार असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

  सर्वांचा सहभाग आवश्यक

  कॉन्टिनेंटल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. रियाज खान यांनी सांगितले की या साथीच्या काळात सर्व लोकांना हर्ड इम्युनिटीच्या (Herd Immunity)स्तरावर आणणं हा लसीकरणाचा मुख्य उद्देश आहे. जोपर्यंत सर्व नागरिक या अभियानात आपला सहभाग नोंदवत लस घेत नाहीत,तोपर्यंत हे शक्य नाही. कोरोना विरुध्दच्या या लढाई सामुदायिक प्रयत्न गरजेचे आहेत.

  घाई करण्याची गरज

  एसएलजी हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिन विभागाच्या सल्लागार डॉ. आरती बेल्लारी यांनी सांगितले की कोविशिल्ड (Covi-shield)असो वा कोवॅक्सिन (Covaxin), लसीकरणावर भर देणं आवश्यक आहे. जी लस सहज उपलब्ध होईल ती तातडीनं घेणं गरजेचं आहे. दोन्ही लसींचे परिणाम सिध्द झाले असून, एक डोस घेतला तरी त्यामुळे पुरेशी सुरक्षा मिळू शकेल. लोकांनी लस घेण्याकरिता वर्षभर थांबण्यात काही अर्थ नाही. लोक जितकी ही गोष्ट टाळतील तितका विषाणूचा व्हेरियंट म्युटेट (New variant of coronavirus) होण्याचा धोका वाढेल.

  अमेरिकेतील डोजसिटी येथील वेस्टर्न प्लेन्स हॉस्पिटलच्या डॉ. अनुषा कारा म्हणाल्या की, लस तातडीने घेण्यावर भर दिला पाहिजे. शास्त्रज्ञांकडे इतका डेटा जमा झाला आहे की आता लोकांनी लस आणि वैद्यकीय विश्वावर विश्वास ठेवला पाहिजे. येता काळ हा भारत आणि जगभरातील अन्य देशांसाठी निर्णायक ठरेल,असे तज्ज्ञांचे मत आहे.

  First published:

  Tags: Corona vaccine, Coronavirus