नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी: शुक्रवारी मल्टि कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचांदीच्या दरात (Gold and Silver Price on Friday) तेजी पाहायला मिळाली आहे. आज सकाळी 11 वाजता 5 एप्रिलच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 0.44 टक्के अर्थात 205 रुपयांनी वाढले आहेत, परिणामी या तेजीमुळे सोन्याचे दर 46,920 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत होते. दुपारी 12 वाजता दरात 184 रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. या तेजीनंतर भाव 46899 रुपये प्रति तोळा झाले आहेत. मार्चच्या चांदीची वायदे किंमत 1.12% ने अर्थात 746 रुपयांनी वाढून 67,564 रुपये प्रति किलोग्रॅमवर दर ट्रेडिंग सुरू होतं.
याआधीच्या सत्रामध्ये दिल्लीत सोन्याचे दर 47,137 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते, तर चांदी 67,170 रुपये प्रति किग्रा होती.
अर्थसंकल्पामध्ये कस्टम ड्यूटी 7.5 टक्के करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमतीमध्ये तेजी पाहायला मिळते आहे. अमेरिकेमध्ये सोन्याचे दर 0.58 डॉलरच्या तेजीमुळे 1,795.63 डॉलर प्रति औंस झाले आहेत, तर चांदी 0.03 डॉलरच्या घसरणीमुळे 26.30 डॉलर या स्तरावर आहे.
(हे वाचा-Petrol Price: पुण्यामध्ये पेट्रोलचे दर विक्रमी स्तरावर! 93 रुपयांनी होतेय विक्री)
काय आहेत आजचे भाव?
-22 कॅरेट सोन्याचे दर: 46,600 रुपये प्रति तोळा
-24 कॅरेट सोन्याचे दर: 47,600 रुपये प्रति तोळा
चांदीचे दर
आज चांदीच्या दराची सुरुवात 67205 रुपये प्रति किलोने झाली आहे. एमसीएक्सवर चांदीचे दर दुपारी 12 वाजता 832 रुपयांच्या तेजीमुळे 67650 रुपयांवर ट्रेड करत होती. मेच्या डिलिव्हरीच्या चांदीच्या किंमतीतही आज 743 रुपयांची तेजी पाहायला मिळाली, हा भाव 68744 रुपये प्रति किलोवर पोहोचला होता.
(हे वाचा-एका व्यक्तीच्या PF खात्यामध्ये 102 कोटी रुपये! आश्चर्यकारक माहिती आली समोर)
सराफा बाजारातील भाव
दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोनं प्रति तोळा 322 रुपयांनी स्वस्त झालं होतं. या घसरणीनंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 47,137 रुपये प्रति तोळा झाली होती. गुरुवारी चांदीचे दर 1000 रुपये प्रति किलोने कमी होऊन प्रति किलो 67,170 रुपये झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver prices today, The gold