नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये जमा असणाऱ्या पैशांसदर्भात एक आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. अशी माहिती समोर आली आहे की, जास्त पगार मिळणाऱ्या (High Net worth Individuals) काही व्यक्तींच्या पीएफ खात्यामध्ये 62,500 कोटी रुपये जमा आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, यामध्ये अशी देखील एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीच्या खात्यामध्ये 102 कोटी रुपये आहेत. अलीकडेच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पानुसार (Budget 2021) सरकारने असा निर्णय घेतला आहे की, जर एखादी व्यक्ती त्याच्या पीएफ खात्यामध्ये वार्षिक 2.5 लाखापेक्षा जास्त योगदान करत असेल तर त्याला व्याजावर टॅक्स सवलतीचा लाभ मिळणार नाही.
अर्थमंत्रालयाच्या (Ministry of Finance) महसूल विभागाच्या (Revenue Department) सूत्रांच्या हवाल्याने पीटीआय वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे की, EPF खात्यांमध्ये योगदान करणाऱ्या एकूण खातेधारकांची संख्या 4.5 कोटी आहे. यामध्ये 0.3 टक्क्यांपेक्षाही कमी अर्थात 1.23 लाख खाती अशी आहेत ज्यामध्ये मोठे योगदान केले जाते, जास्त पगार असणाऱ्यांची ही खाती आहेत.
(हे वाचा-बंद होणार BSNL-MTNL? या कंपन्यांबाबत काय आहे सरकारचा प्लॅन)
टॉप 100 HNI खात्यांमध्ये 2000 कोटी रुपये जमा
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या या उच्च-उत्पन्नातील लोकांच्या पीएफ खात्यात 62,500 कोटी रुपये जमा आहेत आणि सरकार त्यांना करात सूट देऊन 8 टक्के निश्चित परतावा देत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एका व्यक्तीच्या खात्यात 103 कोटींपेक्षा जास्त रुपये जमा आहेत. त्याचबरोबर अशा दोन अन्य लोकांच्या खात्यात 86-86 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्वाधिक पीएफ असणाऱ्या सर्वोच्च 20 व्यक्तींच्या खात्यामध्ये 825 कोटी रुपये जमा आहेत. अशाप्रकारच्या सर्वोच्च 100 खात्यांमध्ये साधारण 2000 कोटी रुपये आहेत.
(हे वाचा- Gold Rates: सलग चौथ्या दिवशी उतरले सोन्याचे भाव, चांदीचीही झळाळी झाली कमी)
सूत्रांची अशी माहिती आहे की, अर्थसंकल्पातील प्रस्तावाचे योगदानकर्त्यांमधील असमानता दूर करणे, त्या उच्च उत्पन्न गटांना लगाम घालणे जे निश्चित व्याज दराच्या तरतुदीचा फायदा घेण्यासाठी मोठी रक्कम जमा करत आहेत, हे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.