Home /News /money /

Gold Price Today: सोन्याचांदीची झळाळी उतरली, दागिने खरेदीआधी इथे तपासा बुधवारचे दर

Gold Price Today: सोन्याचांदीची झळाळी उतरली, दागिने खरेदीआधी इथे तपासा बुधवारचे दर

Gold Silver Price, 9 December 2020 : देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर आज उतरले आहे. तर चांदी देखील आज 800 हून अधिक किंमतीने स्वस्त झाली आहे.

    नवी दिल्ली, 09 डिसेंबर: देशांतर्गत बाजारात बुधवारी सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. बुधवारी 9 डिसेंबर 2020 रोजी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today) 118 रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदीचे दरही आज उतरले आहेत. एक किलो चांदीच्या दरात (Silver Price Today) 875 रुपयांची घसरण झाली आहे. याआधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर  49,339 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. तर चांदीचे दर 64,285 रुपये प्रति किलो होते. जाणकारांच्या मते कोव्हिड-19 व्हॅक्सिन (Coronavirus Vaccine) बाबत आलेल्या सकारात्मक बातम्यांमुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचांदीचे दर कमी झाल्याने भारतात सोन्याचांदीचे दर कमी झाले आहेत. सोन्याचे नवे भाव (Gold Price on 09th December 2020) दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर 118 रुपयांनी कमी झाले आहेत. यानंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याचे दर  49,221 रुपये प्रति तोळा झाले आहेत. याआधीच्या सत्रात सोन्याचे दर 49,339 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,860 डॉलर प्रति औंस झाले आहेत. (हे वाचा-शिवाजीराव भोसले बँकेच्या ठेवीदारांना दिलासा? सहकार विभागाने दिला नवा प्रस्ताव) चांदीचे नवे भाव  (Silver Price on 09th December 2020) चांदीच्या किंमतीमध्ये आज घसरण पाहायला मिळाली. मंगळवारी चांदी 3000 पेक्षा जास्त किंमतींनी वाढली होती. मात्र आज चांदीच्या दरात 875 रुपयांची घसरण झाली आहे. यानंतर चांदीचे भाव प्रति किलो 63,410 रुपये झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचे दर 24.22 डॉलर प्रति औंस आहेत. (हे वाचा-कराड जनता सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द झाल्यानंतर ठेवीदाराचं काय होणार?) का कमी झाले सोन्याचांदीचे भाव एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities) चे सीनियर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल (Tapan Patel) यांच्या मते बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये एक पैशाची घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे सोन्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमती कमी झाल्याने देशांतर्गत बाजारातही किंमती उतरल्या आहेत. याशिवाय कोरोना व्हॅक्सिनबाबत सकारात्मक बातम्या समोर आल्याने सोन्याच्या किंमतीवरील दबाव वाढत आहे. त्यांनी असे म्हटले की अमेरिकेत स्टिम्यूलस पॅकेजची घोषणा झाली आणि डॉलरचे मुल्य कमी झाले तर सोन्याचे भाव आणखी घसरण्याची शक्यता आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या