नवी दिल्ली, 23 जून: भारतीय सराफा बाजारात 23 जून रोजी बुधवारी सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) सलग तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली आहे. तर आज चांदीच्या किंमतीतही (Silver Price Today) वाढ झाली आहे. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 46,286 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. तर चांदीचे दर बाजार बंद होत असताना 66,540 रुपये प्रति किग्रा होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात आज किरकोळ तेजी पाहायला मिळाली. तर चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान आज जरी सोन्याचे दर वधारले असले तरीही गेल्यावर्षी सर्वोच्च स्तरावर पोहोचलेल्या किंमतीपेक्षा दर 10,600 रुपयांनी कमी आहेत. सोन्याचे लेटेस्ट दर (Gold Price, 23 June 2021) दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर 110 रुपये प्रति तोळाने वाढले आहेत. या वाढीनंतर दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅमच्या शुद्धतेच्या सोन्याचे दर 46,396 रुपये प्रति तोळा झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर किरकोळ फरकाने वाढून 1,783 डॉलर प्रति औंस झाले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात 7 ऑगस्ट 2020 रोजी सोन्याचे दर (Gold Price) 57,008 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. त्यानुसार सोन्याचे दर आता सर्वोच्च स्तराहून 10,612 रुपयांनी स्वस्त आहेत. हे वाचा- या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घरासाठी पुढील वर्षापर्यंत मिळणार अॅडव्हान्स चांदीचे लेटेस्ट दर (Silver Price, 23 June 2021) चांदीच्या किंमतीतही आज तेजी पाहायला मिळाली. दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी चांदीचे (Silver Price) दर 324 रुपयांनी वाढून 66,864 रुपये प्रति किग्रा झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही, याठिकाणी चांदीचे दर 25.94 डॉलर प्रति औंस आहेत. हे वाचा- नोकरी गेली तरी नो टेन्शन! ESIC च्या या स्कीममधून मिळेल आर्थिक मदत, वाचा सविस्तर का वाढले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्योरिटीजचे (HDFC Securities) सीनिअर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, न्यूयॉर्क स्थित कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज स्पॉट गोल्डची किंमत वाढली आहे. यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर वाढले आहे. दरम्यान असं असलं तरीही आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर स्थिर असूनही देशांतर्गत बाजारात चांदीचे दर वधारले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.