Home /News /money /

या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घर बनवण्यासाठी पुढील वर्षापर्यंत मिळेल स्वस्त अ‍ॅडव्हान्स

या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घर बनवण्यासाठी पुढील वर्षापर्यंत मिळेल स्वस्त अ‍ॅडव्हान्स

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर घर बनवण्याचा विचार करत असाल तर 31 मार्च 2022 पर्यंत तुम्ही हाउस बिल्डिंग अ‍ॅडव्हान्स घेऊ शकता.

    नवी दिल्ली, 23 जून: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर घर बनवण्याचा विचार करत असाल तर 31 मार्च 2022 पर्यंत तुम्ही हाउस बिल्डिंग अ‍ॅडव्हान्स (HBA) घेऊ शकता. ही योजना 1 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली होती. याअंतर्गत केंद्र सरकार 31 मार्चपर्यंत त्यांच्या कर्मचाऱ्यांना 7.9 टक्के व्याजदराने HBA देत आहे. सातव्या वेतन आयोगातील शिफारस (7th Pay commission) आणि House Building Advance च्या नियमानुसार, केंद्रीय कर्मचारी नवीन घर बनवण्यासाठी तसंच नवं घर-फ्लॅट खरेदी करण्यासाठी 34 महिन्यांची बेसिक सॅलरी, जास्तीत जास्त 25 लाख किंवा घराची किंमत किंवा अ‍ॅडव्हान्सची परतफेड करण्याची क्षमता यापैकी जे काही कमी आहे ती रक्कम अ‍ॅडव्हान्स स्वरुपात घेऊ शकतात. या आगाऊ घेण्यात आलेल्या रकमेवर 7.9 टक्के दराने व्याज द्यावं लागेल. हे वाचा-8 दिवसात बदणार हे महत्त्वाचे आर्थिक नियम, नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या सविस्तर घराच्या विस्तारासाठी मिळतील 10 लाख हाऊस बिल्डिंग अ‍ॅडव्हान्स नियमांनुसार, घराच्या विस्तारासाठी जास्तीत जास्त दहा लाख रुपयांची आगाऊ रक्कम किंवा 34 महिन्यांच्या मूलभूत पगाराइतकी रक्कम किंवा घराच्या विस्तारासाठी लागणाऱ्या खर्चाइतकी रक्कम, यापैकी जे काही कमी असेल ती रक्कम तुम्हाला मिळेल. आगाऊ घेतलेली रक्कम पहिल्या 15 वर्ष किंवा 180 महिन्यांपर्यंत वसूल केली जाईल. उर्वरित पाच वर्षांमध्ये म्हणजेच 60 महिन्यांत ते व्याज म्हणून ईएमआयमध्ये वसूल केले जाईल. या आगाऊ रकमेवर 7.9 टक्के दराने व्याज आकारले जाईल. हे वाचा-नोकरी गेली तरी नो टेन्शन! ESIC च्या या स्कीममधून मिळेल आर्थिक मदत, वाचा सविस्तर अ‍ॅडव्हान्स घेऊन फेडू शकता बँकेचं कर्ज तुम्ही नवीन घर बनवण्यासाठी, फ्लॅटसाठी घेतलेलं कर्ज देखील या आगाऊ रकमेतून फेडू शकता. ही आगाऊ रक्कम स्थायी कर्मचाऱ्यांसह अस्थायी कर्मचाऱ्यांना देखील मिळेल. मात्र अस्थायी कर्मचाऱ्यांची नोकरी सलग पाच वर्षं असणं आवश्यक आहे. ज्या दिवसापासून कर्मचाऱ्यांनी बँक किंवा वित्तिय संस्थेकडून कर्ज घेतलं आहे, कर्मचाऱ्यांना त्या दिवसापासून हाउस बिल्डिंग अ‍ॅडव्हान्स देण्यात येईल. जरी घर बनवण्याकरता आगाऊ रकमेसाठी तुम्ही आधी अर्ज केला असला तरी ही रक्कम त्यादिवशी मिळेल ज्या दिवशी तुम्हाला लोन देण्यात आलं असेल. बँक रिपेमेंटसाठी एकरकमी आगाऊ रक्कम मिळेल. दरम्यान आगाऊ रक्कम जारी झाल्याच्या एका महिन्यात कर्मचाऱ्यांना HBA Utilization Certificate जमा करावं लागेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Central government, Money

    पुढील बातम्या