जाहिरात
मराठी बातम्या / मनी / नोकरी गेली तरी नो टेन्शन! ESIC च्या या स्कीममधून मिळेल आर्थिक साहाय्य, वाचा सविस्तर

नोकरी गेली तरी नो टेन्शन! ESIC च्या या स्कीममधून मिळेल आर्थिक साहाय्य, वाचा सविस्तर

नोकरी गेली तरी नो टेन्शन! ESIC च्या या स्कीममधून मिळेल आर्थिक साहाय्य, वाचा सविस्तर

ESIC Unemployment Benefits: तुम्हाला देखील बेरोजगारीचा सामना करावा लागत असेल तर चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही RGSKY Benefits या स्कीमअंतर्गत तुम्हाला बेरोजगारी भत्ता (Unemployment Allowance) मिळू शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 23 जून: कोरोना काळात (Coronavirus Pandemic) अनेक जणांनी नोकरी गमावली आहे. अनेकांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे. तुम्हाला देखील बेरोजगारीचा सामना करावा लागत असेल तर चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही RGSKY Benefits या स्कीमअंतर्गत तुम्हाला बेरोजगारी भत्ता (Unemployment Allowance) मिळू शकतो. काय आहे योजना? राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना  (Rajiv Gandhi Shramik Kalyan Yojana– RGSKY) यावेळी तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. 2005 पासून बेरोजगारी भत्ता देण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. तुम्ही ESIC योजनेअंतर्गत कव्हर होत असाल तर तुम्हाला या आर्थिक मदत मिळेल. या अंतर्गत आर्थिक मदत म्हणून तुम्हाला व्यक्तीच्या उत्पन्नाच्या 50 टक्के रक्कम बेरोजगारी भत्त्याच्या स्वरुपात मिळेल. जास्तीत जास्त दोन वर्षापर्यंत तुम्हाला ही मदत मिळू शकते. हे वाचा- 8 दिवसात बदणार हे महत्त्वाचे आर्थिक नियम, नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या सविस्तर काय आहेत अटी? राजीव गांधी श्रमिक कल्याण योजनेचा लाभ केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयामार्फत राबविल्या जाणार्‍या ESIC योजनेंतर्गत देण्यात आला आहे. ही योजना आधीच ईएसआयसीअंतर्गत कव्हर होणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. ESIC ने ट्विटरवरून याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.   आयडी कायद्यांतर्गत, जर ईएसआयसी विमाधारकास नोकरकपात किंवा फॅक्टरी बंद झाल्यामुळे नोकरी गमावली तर तो बेरोजगारी भत्त्यास पात्र आहे. विमाधारकास बेरोजगारी भत्त्यासाठी शाखा कार्यालयात अर्ज करावा लागतो. शाखा कार्यालय या अर्जाच्या दाव्याची छाननी करते आणि एसआरओ किंवा आरओकडे अर्ज पाठवते. यानंतरच त्या व्यक्तीला भत्ता मिळतो. हे वाचा- दोन महिन्याच्या निचांकी पातळीवर सोन्याचे दर, चांदी वधारली; इथे तपासा आजचे भाव CMIE च्या अहवालानुसार भारतात 21 जून पर्यंत सरासरी बेरोजगारी 10.6 टक्के आहे. 7 जून रोजी हा दर 12.99 टक्क्यांवर पोहोचला होता. गेल्या दोन आठवड्यापासून यात काहीशी सुधारणा झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात